Join us

कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'ला रिलीजचा मुहूर्त सापडेना, जाणून घ्या काय आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 6:20 AM

कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'  या चित्रपटाच्या रिलीजला काही मुहूर्त सापडत नाही आहे. पुन्हा एकदा या चित्रपटाची ...

कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'  या चित्रपटाच्या रिलीजला काही मुहूर्त सापडत नाही आहे. पुन्हा एकदा या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटातील वीएफएक्सचे काम अजून बरेच बाकी आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटातील बराचा हिस्सा क्रोमावर शूट करण्यात आला आहे. त्यासाठी ग्राफिक्स आणि विज्युअल इफेक्ट्स तयार करण्यात येत आहेत. चित्रपटातील वीएफएक्सचे काम वेगवेगळ्या स्टुडिओमध्ये देण्यात येते जेणेकरुन काम लवकरच संपेल. मात्र मणिकर्णिका चिपटाच्याबाबतीत असे झाले नाहीय. वीएफएक्सचे सर्व काम एकाच कंपनीला देण्यात आलेले आहे त्यामुळे चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात येते आहे. याआधी हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार होता.   'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांसी'चा दिग्दर्शक कृष  यांचा हा बॉलिवूडमधील दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा चान्स घ्यायचा नाही आहे. त्यामुळे कृष सगळ्या गोष्टींवर नजर ठेवून आहेत.ALSO READ :  सोशल मीडियापासून का दूर पळते कंगना राणौत?'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपट कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. ती याचित्रपटातून मोठ्या पडद्यावर एंट्री घेते आहे.सामान्य कुटुंबात जन्मलेल्या झलकारीबाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटात कडून कंगना खूप अपेक्षा आहेत.  बाहुबली’ आणि ‘बजरंगी भाईजान’ सारख्या चित्रपटांची कथा लिहिणारे विजयेंद्र प्रसाद यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे.