अभिनेत्री कंगना राणौत सध्या जाम चर्चेत आहे. कधी बॉलिवूडमधील घराणेशाही, कधी करण जोहर, कधी आलिया भट, कधी शिवसेना अशा सर्वांसोबत कंगनाने वाद ओढचून घेतले. शिवसेनेसोबतचा तिचा वाद आणि शिवसेनेवरची टीका तर सुरुच आहे. मात्र आज आम्ही कंगनाच्या वादांबद्दल नाही तर तिच्या कधीही न रिलीज झालेल्या सिनेमांबद्दल सांगणार आहोत. होय, कंगनाच्या या सिनेमांना मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याचे सौभाग्यच लाभले नाही. रिलीज होण्याआधीच तिचे हे सिनेमे डब्बाबंद झालेत. कंगनाचे हे सिनेमे रिलीज न होण्यामागे वेगवेगळी कारणे आहेत. कंगनाचे एक नाही, दोन नाही तर 3 सिनेमे कधीच प्रदर्शित झाले नाहीत. यापैकी एक सिनेमा तर कंगनाचा ड्रिम प्रोजेक्ट होता. तर दोन सिनेमांत ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार होती.
आय लव्ह यू बॉस
आय लव्ह यू बॉस हा सिनेमा कधीच रूपेरी पडद्यावर झळकला नाही. या सिनेमात कंगना बिग बींसोबत झळकणार होती. बिग बी कंगनाच्या बॉसची भूमिका साकारणार होते. दिग्दर्शक व निर्माते पहलाज निहलानी हे हा सिनेमा बनवणार होते आणि दीपक शिवदासानी हे हा सिनेमा दिग्दर्शित करणार होते. या चित्रपटासाठी कंगनाने हॉट फोटोशूटदेखील केले होते. यात तिने एका हॉलिवूड मुव्हीचे पोस्टर कॉपी केले होते. मात्र का कुणास ठाऊक हा सिनेमा कधीच रिलीज झाला नाही.
‘पॉवर’चीही झाली ‘बत्तीगुल’
आय लव्ह यू बॉस या सिनेमात बिग बींसोबत काम करण्याचे कंगनाचे स्वप्न भंगले. मात्र यानंतर त्यांच्यासोबत काम करण्याची दुसरी संधी कंगनाला मिळाली होती. होय, राजकुमार संतोषी यांनी एक मल्टिस्टारर सिनेमा बनवण्याचा विचार केला आणि यात दिग्गज स्टारकास्ट घेण्याचेही त्यांनी ठरवले. अमिताभ यांच्यासोबत संजय दत्त, अनिल कपूर, अजय देवगण अशी नावेही ठरली. हिरोईन म्हणून कंगना व अमीषा पटेल या दोघींच्या नावांवरही शिक्कामोर्तब झाले. पण 2010 मध्ये या सिनेमाच्या मुहूर्ताचा शॉट चित्रीत केला गेला तेव्हा केवळ हे चार लीड हिरो तेवढेच बोलवले गेलेत. दोन्ही हिरोईन मुहूर्ताला गैरहजर राहिल्या. यानंतर हा सिनेमा डब्बाबंद झाला. हा सिनेमा का रखडला याच्याबद्दलच्या अनेक कथा यापश्चात समोर आल्या. काहींच्या मते संजय दत्तला शिक्षा झाल्याने हा सिनेमा डब्बाबंद झाला तर काहींच्या मते, निर्माता व दिग्दर्शकामधील वादामुळे हा सिनेमा मध्येच रखडला.
करणने काय बनवले तर बकवास सिनेमे...! शिवसेना सोडून अचानक करण जोहरवर का घसरली कंगना राणौत?
कंगना राणौतचा बच्चन कुटुंबावर हल्ला; "एके दिवशी अभिषेक फासावर लटकला असता तेव्हा..."
तेजूमणिकर्णिका या आपल्या बॅनरखाली कंगना राणौत ‘तेजू’ हा सिनेमा बनवणार होती. या सिनेमात कंगना 80 वर्षांच्या महिलेची भूमिका साकारणार होती, कंगनाने ही कथा लिहिली होती आणि तीच हा सिनेमा दिग्दर्शित करणार होती. ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘सिमरन’चे निर्माता शैलेश सिंग यांच्यासोबत मिळून कंगना या चित्रपटाची निर्मिती करणार होती. पण 2017-18 मध्ये कंगनाचा ‘सिमरन’ हा सिनेमा आपटला आणि शैलेश सिंग यांनी ‘तेजू’मधून हात काढून घेतला. मग काय, ‘तेजू’ची कल्पना आणि अख्खा सिनेमा रखडला. मात्र योग्य वेळ येताच हा सिनेमा नक्की बनणार, हा कंगनाचा निर्धार कायम आहे.