कंगना राणौतचा क्वीन चित्रपट तयार होणार चार भाषांमध्ये.. या दोन अभिनेत्रींना मिळाली चित्रपटात एंट्री!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 4:49 AM
क्वीन या चित्रपटांना रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. या चित्रपटात कंगनाने केलेल्या अभिनयाचे सगळ्याच स्तरावर कौतुक झाले. हा ...
क्वीन या चित्रपटांना रसिकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. या चित्रपटात कंगनाने केलेल्या अभिनयाचे सगळ्याच स्तरावर कौतुक झाले. हा चित्रपट कंगनाच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला असे म्हटले तरी वावगे ठरु नये. या चित्रपटानंतर कंगनाला बॉलिवूडमध्ये क्वीन या नावाने लोक ओळखू लागले. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाच्या रिमेकची चर्चा आहे. या चित्रपटाच्या रिमेकवर काम देखील सुरु झाले आहे. हा चित्रपट चार भाषांमध्ये तयार करण्यात येणार आहे. या चित्रपट तमन्ना भाटिया, काजल अग्रवाल, मंजिया मोहन आणि पारुल यादव यांची नावं फायनल करण्यात आली आहेत. ऐवढेच नाही तर क्वीनमध्ये कंगना राणौवतच्या खास मैत्रिणीची भूमिका लिसा हेडेनने साकारली होती. या चित्रपटात ही भूमिका एमी जैक्सन साकारणार होती. मात्र एमी जैक्सनसोबत शूटिंगच्या तारखा मॅच होत नसल्याने तिला या प्रोजेक्टमधून वगळावे लागले. त्यामुळे विजय लक्ष्मीची भूमिका तेलुगू आणि मल्याळमध्ये शिबानी दांडेकर साकारणार आहे तर तमिळ आणि कन्नड रिमेकमध्ये एली अवराम. क्वीनमध्ये कंगनाने एक साध्या-सरळ मुलीची भूमिका साकारली होती. जिचे लग्न अचानक कॅन्सल होते. त्यामुळे ती एकटीच हनीमूनला निघून जाते. यूरोपमध्ये फिरताना त्याच्यात वेगळ्याच आत्मविश्वास येतो. याचित्रपटातील अभिनयासाठी कंगनाला अनेक अॅवॉर्ड देखील मिळाले होते. ALSO READ : कंगना राणौतने पुन्हा केला इंडस्ट्रीवर ‘हल्ला’!!कंगनासध्या 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित आहे. यात कंगना राणी लक्ष्मीबाईंची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या सेटवरचे फोटो व्हायरल देखील झाले होते. या चित्रपटाची शूटिंग जयपूरच्या आमेर किल्ल्यामध्ये सुरु आहे. लेखक विजयेंद्र प्रसादने नुकतेच सांगितले की 'ह्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या चित्रपटात भरपूर युद्धचे दृश्य आहेत' याआधी लेखक विजयेंद्रने बाहुबली आणि बजरंगी भाईजान सारख्या चित्रपटांची कथा लिहिली आहे त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाकडून फार अपेक्षा आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.