Join us

 तूफानों की कमी नहीं इस नाव को...! शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’वर कंगनाची टिवटिव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2020 10:27 AM

कंगनाने शेतक-यांच्या ‘भारत बंद’ आंदोलनावर ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये तिने सद्गगुरूंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे.

ठळक मुद्देकंगनाचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होते. तिचे सपोर्टर साहजिकच तिला सपोर्ट करत आहेत. काहींनी मात्र यावरून कंगनाला ट्रोल करणे सुरु केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतची टिवटिव थांबण्याचे नाव नाही. गेल्या काही दिवसांपासून कंगना शेतकरी आंदोलनावरून वादात सापडली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंगनाने अलीकडे केलेले ट्वीट आणि त्यावरून अभिनेता दिलजीत दोसांज व तिच्यात रंगलेले ‘ट्वीटर वॉर’ तुम्हाला ठाऊक असेलच. आता कंगनाने शेतक-यांच्या ‘भारत बंद’ आंदोलनावर ट्वीट केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये तिने सद्गगुरूंचा एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यात ते निदर्शनांबद्दल बोलत आहेत.

काय म्हणाली कंगना?

व्हिडीओ शेअर करत कंगनाने शेतक-यांच्या ‘भारत बंद’ आंदोलनावर उपरोधिक ताशेरे ओढले. ‘आओ भारत को बंद कर देते हैं, यूं तो तूफानों की कमी नहीं इस नाव को, मगर लाओ कुल्हाड़ी कुछ छेद भी कर देते हैं, रह रह के रोज मरती है हर उम्मीद यहां, देशभक्तों से कहो अपने लिए देश का एक टुकड़ा अब तुम भी मांग लो, आ जाओ सड़क पे और तुम भी धरना दो, चलो आज यह किस्सा ही खत्म करते हैं,’असे तिने लिहिले.कंगनाचे हे ट्वीट वेगाने व्हायरल होते. तिचे सपोर्टर साहजिकच तिला सपोर्ट करत आहेत. काहींनी मात्र यावरून कंगनाला ट्रोल करणे सुरु केले आहे. ‘तू सोशल मीडियावरून ब्रेक घेतलास तर कसे होईल? देशावर खरचं उपकार होतील,’ असे एका युजरने यावर तिला सुनावले. एका युजरने तर कंगनाला सणसणीत उत्तर दिले आहे. ‘तू कधी एक गाजर घरी उगवले किंवा मग विकले आहेस? नाही तर मग गप्प बस,’ असे या युजरने लिहिले.

कंगनाचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

कंगनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. कारण या व्हिडीओत कंगना स्वत:च तोंडावर पडल्याचे दिसून येते. हा व्हिडीओ द कपिल शर्मा शोमधील आहे. यावेळी ती 'रंगून' सिनेमाच्या प्रमोशनसाठी तिथे गेली होती. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा कंगनाला प्रश्न विचारताना दिसत आहे. शो दरम्यान कपिल कंगनाला प्रश्न विचारतो की, तुम्ही सोशल मीडिया का वापरत नाही? कपिलच्या या प्रश्नावर उत्तर देताना कंगना कपिलला म्हणते की, 'मला असं वाटते की सोशल मीडियावर रिकामे लोक जास्त आहेत. या लोकांना काहीच कामे नसतात. कारण ज्या लोकांना काम असतं त्यांना सोशल मीडियासाठी वेळच नसतो'.

कंगनाचा हा जुना व्हिडिओ शेअर करत लोक कंगनाला आठवण करून देत आहेत की, आता तू त्याच लोकांच्यात सामिल झाली आहेस ज्या लोकांना काही काम नसतं. कंगनाचा हा जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

टॅग्स :कंगना राणौत