सतत काही ना काही वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि स्वरा भास्कर (Swara Bhaskar). दोघींचे विचार वेगळे त्यामुळे अनेकदा त्यांच्यात खटके उडाले आहेत. दुसरीकडे स्वरा भास्कर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमदसोबत तिने कोर्ट मॅरेज केले. यानिमित्ताने कंगनाने स्वराला शुभेच्छा दिल्या आहेत.
स्वरा भास्करने स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतगर्त कोर्ट मॅरेज केले. यासाठी जानेवारीतच तिने डॉक्युमेंट्स जमा केले होते. तर पुढील वर्षी दोघेही पारंपारिक पद्धतीने निकाह करणार आहेत. शुक्रवारी स्वराने कोर्ट मॅरेज केल्यानंतर फोटो शेअर केले. लाल आणि पांढऱ्या रंगाच्या साडीत ती सुंदर दिसत होती. तर पती फहादनेही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसला. स्वराने लग्नाचे फोटो शेअर करत लिहिले, 'स्पेशल मॅरेज अॅक्टसाठी थ्री चिअर्स! कमीत कमी हा तरी अजून आहे आणि प्रेमाला संधी देणारा आहे. प्रेम करण्याचा हक्क , जोडीदार निवडण्याचा हक्क, लग्न करण्याचा हक्क, एजन्सी चा हक्क हे विशेषाधिकार असू नये.'
कोर्ट मॅरेजनंतर स्वरा नाचत नाचत बाहेर आली. नवरीला नाचताना पाहून सर्वांनीच गाण्यावर ठेका धरला. स्वराने ट्वीट केलेल्या या फोटोंवर कंगनाने कमेंट केली आहे.कंगना लिहिते, 'तुम्ही दोघे आनंदी दिसत आहात आणि ईश्वराची तुमच्यावर कृपा आहे. जोडीदारासोबत लग्न मनाने तर झालंच असतं बाकी सगळी तर औपचारिकता असते.'
कंगनाने स्वराला दिलेल्या शुभेच्छानंतर नेटकरी अवाकच झालेत. 'आयुष्यात पहिलंच सकारात्मक ट्वीट अशी कमेंट एकाने केली आहे.
CAA आंदोलनात झाली भेट, नंतर पडली प्रेमात; कोण आहे स्वरा भास्करचा पती फहाद अहमद?
स्वरा आणि कंगनाने एकमेकींसोबत 'तनु वेड्स मनू' या सिनेमात एकत्र काम केले आहे. मात्र २०२० मध्ये कंगनाने स्वरा आणि तापसी पन्नू ला 'बी ग्रेड एक्ट्रेस' असे संबोधले होते. यानंतर दोघींमध्ये ट्विटर वॉर सुरु झाला. तापसी आणि स्वरा दोघीही इंडस्ट्रीत आऊटसाईडर्स आहेत. करण जोहरला प्रभावित करण्यासाठी दोघीही नेपोटिझमला मानत नाहीत मात्र तरी काम मिळत नाही, असंही कंगना म्हणाली होती.