सातत्याने ट्विट्स करत कंगना राणौत शेतकरी आंदोलनास विरोध करतेय. पण आता शेतकरी आंदोलनावरील ट्विट्समुळे कंगनाचा ‘धाकड’ हा सिनेमा अडचणीत आला आहे. होय, या ट्विट्ससाठी कंगना माफी मागत नाही, तोपर्यंत या सिनेमाचे शूटींग मध्यप्रदेशात होऊ देणार नाही, अशी थेट धमकी काँग्रेस कार्यर्त्यांनी दिली आहे. आता यावर कंगनाची प्रतिक्रिया आली आहे. या धमकीला तिने ट्विटद्वारे उत्तर दिले आहे. ‘मला नेतागिरीत काहीही रस नाही. पण आता असे वाटतेय की, काँग्रेसी मला नेता बनवूनच सोडतील,’असे ट्विट कंगनाने केले आहे.
काय आहे प्रकरणकंगनाच्या ‘धाकड’ या सिनेमाचे मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्याच्या सारणी भागात शूटींग सुरु आहे. द ट्रिब्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, याच बैतुल जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी कंगनाला धमकी दिली आहे. कंगना शेतकरी आंदोलनासंदर्भात केलेल्या ट्विटवर माफी मागितली नाही,तोपर्यंत ‘धाकड’ चित्रपटाचे शूटिंग होऊ देणार नाही, अशी ही धमकी आहे.शेतकरी आंदोलनाला विरोध करत कंगनाने अनेक ट्विट्स केले होते. यापैकी काही वादग्रस्त ट्विट्सवरून वाद पेटला होता. आपल्या ट्विट्समध्ये कंगनाला आंदोलनकर्त्या शेतकºयांना खलिस्तानी, दहशतवादी असल्याचे म्हटले होते. या वादग्रस्त ट्विट्सपैकी काही ट्विट्स ट्विटरने डिलीट केले आहेत.यावरून तिच्याविरोधात तक्रारही करण्यात आली आहे. कंगना ही इंडस्ट्रीतील सर्वात बिनधास्त अॅक्ट्रेसेसपैकी एक म्हणून ओळखली जाते. ती देशाशी संबंधित असलेल्या अनेक मुद्द्यांवर सोशल मिडियावरून आपल्या कमेंट देताना दिसते. यामुळे ती यापूवीर्ही आनेक वेळा वादातही सापडली आहे.