कंगना राणौतच्या मणिकर्णिकाच्या ट्रेलर आधी 'हे' दमदार पोस्टर पाहाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 11:30 AM2018-12-18T11:30:33+5:302018-12-18T11:36:26+5:30
कंगना राणौतचा सिनेमान मणिकर्णिका सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने पाहतायेत.
कंगना राणौतचा सिनेमान मणिकर्णिका सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक या सिनेमाच्या ट्रेलरची वाट मोठ्या उत्सुकतेने पाहतायेत. आज दुपारी 2 वाजता ट्रेलर रिलीज होणार आहे. मेकर्स सिनेमाचा आणखी एक दमदार पोस्टर आऊट केले आहे.
Presenting Kangana Ranaut in and as #Manikarnika - the Queen of Jhansi. Trailer out at 2 PM today! Releasing on 25 January 2019. pic.twitter.com/usiSQ410ee
— Kangana Ranaut Daily (@KanganaDaily) December 18, 2018
पोस्टरमध्ये राणी लक्ष्मीबाईची भूमिका साकारत असलेली कंगना राणौत मुलाला मांडीवर घेऊन बसलेली दिसतेय. सोबतच पोस्टरवर ट्रेलरची रिलीज डेट लिहिण्यात आलेली आहे.
Presenting the first look of #Manikarnika - The Queen of Jhansi starring Kangana Ranaut. Releasing on 25 January 2019! pic.twitter.com/BlAQWKzZ71
— Kangana Ranaut Daily (@KanganaDaily) August 14, 2018
या चित्रपटात कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाईची भूमिका करताना दिसणार आहे. सोबतच ती या चित्रपटाची सहदिग्दर्शिकाही आहे. राणी लक्ष्मीबाईचा संघर्ष, त्यांचे शौर्य असे सगळे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हिंदी शिवाय हा चित्रपट तामिळ व तेलगू भाषेतही डब करण्यात आला आहे. येत्या २५ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. ‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या सिनेमासाठी कंगनाने १४ कोटी रूपये घेतले. आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी इतकी फी घेतली नाही.
क्रिश हे या चित्रपटाचे अधिकृत दिग्दर्शक आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली चित्रपट पूर्ण झाल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटात काही पॅचवर्क व नवे सीन्स टाकण्याचा निर्णय घेतला. कंगनाने ४५ दिवसांपर्यंत चित्रपटाचे शूटींग सांभाळले. यादरम्यान तिने अनेक महत्त्वपूर्ण दृश्ये नव्याने चित्रीकरण केलीत. यानंतर चित्रपटाच्या एडिटींगचा जिम्माही तिने सांभाळला. केवळ इतकेच नाही तर व्हिएफएक्स, म्युझिक व फायनल कटचे कामही तिने पाहिले.