सैंडलवुड ड्रग रॅकेट प्रकरणाची चौकशी सेंट्रल काईम ब्राँच करते आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार अभिनेत्री संजना गलरानी अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अभिनेत्री रागिनी व्दिवेदीसह 6 लोकांना अटक केले आहे. संजना गलरानीचा ड्रग्स संबंधित प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आणि त्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
रिपोर्टनुसार, संजनाला अटक करण्यापूर्वी सीबीआयने तिच्या बंगळुरुतल्या इंदिरानगर इथं असलेल्या घरावर छापा टाकला. यावेळी आठ पोलिस अधिकाऱ्यांची टीम होती त्यात एका महिला पोलीस कर्मचारी ही होत्या. रिपोर्टनुसार 8 सप्टेंबर मंगळवारी सकाळी सीबीआयने छापा टाकला आणि त्यानंतर अभिनेत्रीला अटक करण्यात आला. संजनाला चौकशीसाठी सीबीआय कार्यालयात नेण्यात आले आहे.
अभिनेत्री रागिनीला NDPSच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. रागिनी द्विवेदीला 3 दिवसांच्या पोलिस कस्टडीवर पाठवण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फ्रेंसिगच्या माध्यमातून तिला कोर्टासमोर हजर करण्यात आले. रागिणीचा जन्म बेंगळुरूमध्ये झाला असून २००९ मध्ये तिने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. केम्पे गोवडा, रागिनी आयपीएस, बंगारी आणि शिवा या चित्रपटांमधील भूमिकांमुळे ती प्रकाशझोतात आली. रागिनीने काही दिवसांपूर्वीच ड्रग्सबद्दल ट्विट केलं होतं.ड्रग्ज प्रकरणी रागिणी द्विवेदी या अभिनेत्रीच्या घरी छापेमारी, जाणून घ्या ती कोण आहे?