Join us  

Rishab Shetty : पाण्याच्या बाटल्या विकल्या, हॉटेलात राबला..., 18 वर्षांच्या स्ट्रगल काळात ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं खूप काही भोगलं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 5:07 PM

Kantara Actor Rishab Shetty Struggle story : ‘कांतारा’ या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली, यातच सगळं आलं. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी हे नाव चर्चेत आहे...

Kantara Actor Rishab Shetty Struggle story : ‘कांतारा’ (Kantara) या चित्रपटानं सर्वांना वेड लावलं आहे. 15 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटानं वर्ल्डवाईड 250 कोटींवर कमाई केली, यातच सगळं आलं. या चित्रपटानंतर ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) हे नाव चर्चेत आहे. ऋषभ शेट्टी यानेच ‘कांतारा’ हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. त्यानेच या चित्रपटाची कथा लिहिली आहे आणि तोच या कथेचा नायक आहे. म्हणजेच, चित्रपटात लीड रोलही त्यानेच साकारला आहे. 12 वर्षांपूर्वी ऋषभ शेट्टीने आपला अभिनयाचा प्रवास सुरू केला होता  तेव्हा एकदिवस आपण इतका मोठा स्टार बनू, असं त्यालाही वाटलं नव्हतं. पण आज ऋषभ शेट्टी मोठा स्टार आहे. सगळेच त्याच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. ‘कांतारा’मधील त्याचा अभिनय, त्याचं दिग्दर्शन पाहून सगळे स्तब्ध आहेत. याच ऋषभबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण ऋषभचा फिल्मी इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. म्हणजे तो या इंडस्ट्रीत आऊटसाइडर आहे. पण याऊपरही आपल्या मेहनतीच्या जोरावर तो इथपर्यंत पोहोचला. यासाठी तब्बल 18 वर्षे त्याने अथक प्रयत्न केलेत. स्ट्रगल केला.

ऋषभ शेट्टीने कॉलेज पूर्ण केल्यानंतर अ‍ॅक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने थिएटरमध्ये काम करायला सुरूवात केला. ‘कुंडापुरा’ हे त्याचं पहिलं नाटक़ हळूहळू तो नाटकात रूळला. लोकांनी त्याच्या अभिनयाचं कौतुक सुरू केलं आणि हे पाहून ऋषभचा आत्मविश्वास वाढला. कॉलेजच्या दिवसांत छोटंमोठं काम करून तो पैसा कमावयचा. कधी त्याने पाण्याच्या बाटल्या विकल्या तर कधी रिअल इस्टेटमध्ये काम केलं. काही दिवस अगदी हॉटेलातही तो राबला. सोबत सोबत अ‍ॅक्टिंगमध्ये त्याचे प्रयत्न सुरू होते.2004 मध्ये त्याला पहिली संधी मिळाली. Nam Areali Ondina या चित्रपटात त्याला एक भूमिका मिळाली. पण त्याच्या भूमिकेला कोणतंही नाव नव्हतं. फक्त नावापुरती ही भूमिका ऋषभने हसत हसत स्विकारली. यानंतर अशाच अनेक चित्रपटांत छोटे छोटे रोल केलेत. कधी कॅमिओ तर कधी भिकाऱ्याचा रोल केला.

18 वर्षांच्या स्ट्रगल काळात त्याने खूप काही भोगलं.   2019 मध्ये लीड हिरो म्हणून त्याला पहिला ब्रेक मिळाला. बेल बॉटम या चित्रपटात त्याला हिरोची भूमिका मिळाली. पण यानंतरही त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. 2021 मध्ये त्याने ‘कांतारा’ बनवण्यचा विचार केला. स्वत: कथा लिहिली आणि यात स्वत:च अभिनय करण्याचा निर्णय घेतला. ‘कांतारा’ स्वत:च दिग्दर्शित करण्याचं त्याने ठरवलं.

‘कांतारा’ चित्रपटाच्या शूटींगवेळी दैव कोलाच्या दरम्यान शरीरावर एवढा मोठा पोशाख घेऊन वावरणं ही गोष्ट खूपच अवघड होती. हे दृश्य चित्रीत करण्याआधी जवळपास महिनाभर ऋषभने मांसाहार पूर्णपणं बंद केला होता. दैव कोला साकारताना तो  केवळ शहाळं प्यायचा.  चित्रीकरणाआधी आणि झाल्यानंतर त्याला प्रसाद दिला जायचा. केवळ शहाण्यावर असताना चित्रीकरण करत असल्यानं त्याच्या डोळ्यासमोर अनेकदा अंधारी यायची. परंतु न डगमगता त्यानं सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं आणि या मेहनतीचं फळ आज आपल्यासमोर आहे.

टॅग्स :Tollywoodसेलिब्रिटी