Join us

Kantara : प्रभासनंतर कंगना राणौतनं 'कांतारा'चं केलं कौतुक, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 12:54 PM

Kangana Ranaut on Kantara : कांतारा या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाबद्दल अनेक स्टार्सनी आपलं मत मांडलं आहे. दरम्यान आता कंगनानेही या चित्रपटाची प्रशंसा केली आहे.

बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या विधानामुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी ती बॉलिवूड चित्रपटाबद्दल काही बोलते, तर कधी काही स्टार्सबद्दल काही बोलते, ज्यानंतर वाद होतात. आलिया भट(Alia Bhatt)च्या गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाबाबत कंगना रणौत खूप बोलली होती. यानंतर आता कंगनाने पॅन इंडिया चित्रपट कांताराबाबत आपले मत मांडले आहे. कांतारा (Kantara) या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे. या चित्रपटाबद्दल अनेक स्टार्सनी आपलं मत मांडलं आहे.

ऋषभ शेट्टीच्या कांतारा साउथ चित्रपटानंतर आता हिंदी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर जवळपास सगळेच त्याचे कौतुक करत आहेत. नुकतेच साउथ स्टार प्रभासने या चित्रपटाचे कौतुक केले. यानंतर आता कंगना राणौतने या चित्रपटाबाबत आपले मत मांडले आहे. तिने या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे. कंगना रणौतने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आणि म्हटलं, 'या चित्रपटात सर्व काही अप्रतिम आहे. यात अ‍ॅक्शनसोबतच थ्रिलरही आहे. याशिवाय अभिनय, दिग्दर्शन आणि लेखनही अप्रतिम आहे. 

कंगना राणौतने या व्हिडिओमध्ये असेही सांगितले की ती तिच्या कुटुंबासह हा चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. लोक तिच्या या व्हिडीओवर उत्स्फूर्त कमेंट करत आहेत आणि लोक चित्रपटाशी संबंधित त्यांचे अनुभव सांगत आहेत. ऋषभ शेट्टी आणि सप्तमी गौडा यांच्या कांतारा चित्रपटाचे सगळीकडून खूप कौतुक होत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत हिंदी बॉक्स ऑफिसवर १३.१० कोटींचा व्यवसाय केला आहे.  

टॅग्स :कंगना राणौतप्रभास