Join us

Kantara Box Office Collection : ‘कांतारा’ सूसाट! कन्नड सिनेमाने मोडला ‘उरी’चा ‘जादूई’ रेकॉर्ड 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 5:30 PM

Kantara Box Office Collection : कन्नड सिनेमासाठी हे वर्ष शानदार राहिलं. या वर्षात एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या  ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि आता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ छप्परफाड कमाई करतोय.

Kantara Box Office Collection : कन्नड सिनेमासाठी हे वर्ष शानदार राहिलं. या वर्षात एप्रिलमध्ये रिलीज झालेल्या  ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आणि आता ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ (Kantara ) छप्परफाड कमाई करतोय. ‘कांतारा’ची कमाई पाहून सर्वच थक्क झाले आहेत.30 सप्टेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाला चित्रपटगृहांत 40 दिवस पूर्ण झाले आहेत. पण चित्रपट बॉक्स ऑफिसवर सूसाट धावतोय. ‘कांतारा’चं हिंदी व्हर्जन गेल्या 14 ऑक्टोबरला रिलीज झालं. म्हणजेच, हा या चित्रपटाचा चौथा आठवडा आहे. चौथ्या आठवड्यातही हा सिनेमा गर्दी खेचतोय. बॉलिवूडचे चित्रपटांकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले असताना ‘कांतारा’ने बाजी मारली आहे.

उरी’चा विक्रम मोडलाउरी’ या चित्रपटाचा ‘जादूई’ विक्रम मोडीत काढत ‘कांतारा’ने नवा विक्रम नोंदवला आहे. होय, इंडियन बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’ने सहाव्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांतच 17.54 रूपयांचं कलेक्शन केलं आहे. 2019 साली विकी कौशलच्या ‘उरी- द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने सहाव्या आठवड्यात 11.60 कोटींचं कलेक्शन करत ऑल टाइम रेकॉर्ड नोंदवला होता. अनेकांनी ‘उरी’च्या या रेकॉर्डला ‘जादूई’ म्हटलं होतं. पण ‘कांतारा’ने सहाव्या आठवड्यातील पहिल्या तीनच दिवसांत ‘उरी’चा हा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. सहाव्या आठवड्यात ‘कांतारा’ एकूण 26 ते 27 कोटींचा बिझनेस करेल, असा अंदाज आहे.

हिंदी व्हर्जनने चौथ्या आठवड्यात कमावले इतके कोटी‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनचा चित्रपटगृहांतील चौथा आठवडा आहे. चौथ्या आठवड्याच्या पहिल्या तीन दिवसांत या चित्रपटाने 10.75 कोटी कमाई केली आहे. हिंदीत चौथ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रम ‘बाहुबली 2’च्या नावावर आहे. या चित्रपटाने चौथ्या आठवड्यात 29.40 कोटींची कमाई केली होती. तर ‘उरी’ चौथ्या आठवड्यात 29.28 कोटींची कमाई करत दुसऱ्या क्रमांकावर होता. एकीकडे बॉलिवूडचे सिनेमे 10 दिवसही तग धरू शकत नसताना ‘कांतारा’ चौथ्या आठवड्यातही टिकून आहे. ‘कांतारा’च्या हिंदी व्हर्जनने आत्तापर्यंत 62.40 कोटींची कमाई केली आहे. काल रविवारी या चित्रपटाने 4.50 कोटींचा बिझनेस केला. 

टॅग्स :Tollywoodउरीबॉलिवूड