Kantara IMDb :अभिनेता ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) कन्नड सिनेमा ‘कांतारा’ने (Kantara ) सध्या धुमाकूळ घातला आहे. कन्नड व मल्याळम भाषेतील हा सिनेमा गेल्या 30 सप्टेंबरला रिलीज झाला आणि आज 14 ऑक्टोबरला याचं हिंदी व्हर्जन रिलीज झालं. आता काय तर, हा सिनेमा आयएमडीबीवर नंबर-1 बनला आहे. अगदी यशच्या ‘केजीएफ 2’ आणि रामचरण व ज्युनिअर एनटीआरच्या ‘आरआरआर’ या चित्रपटालाही ‘कांतारा’ने मागे टाकलं आहे. सध्या ‘कांतारा’ कर्नाटकच्या बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातलेय.
‘कांतारा’ हा सिनेमा ‘केजीएफ’ बनवणाऱ्या होम्बाले फिल्म्सची निर्मिती आहे. ऋषभ शेट्टी या चित्रपटात लीड रोलमध्ये आहे. त्याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे आणि तोच या सिनेमाचा लेखकही आहे.वृत्त लिहिपर्यंत ‘कांतारा’ला IMDb वर 10 पैकी 9.6 रेटिंग मिळालं आहे. कन्नड चित्रपटसृष्टीत हा एक विक्रम आहे. याआधी ‘केजीएफ 2’ या कन्नड सिनेमाला 8.4 रेटिंग तर ‘आरआरआर’ला 8.0 रेटिंग मिळालं होतं.IMDb च्या रेटिंगमध्ये दुसºया क्रमांकावर रक्षित शेट्टीचा ‘777 चार्ली’ आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला फार यश मिळालं नाही. पण ओटीटीवर हा सिनेमा सगळ्यांनाच आवडला आहे. ‘777 चार्ली’ला 9.0 रेटिंग मिळालं आहे. तिसºया व चौथ्या क्रमांकावर केजीएफ 2 आणि आरआरआर आहे.
‘कांतारा’ने 13 दिवसांत कमावले इतके कोटी‘कांतारा’ने 13 दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे. चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनने 13 दिवसांत 72 कोटींची कमाई केली आहे. ‘कांतारा’चा बजेट केवळ 16 कोटी आहे. त्यामुळे हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला आहे. आधी मेकर्स हा सिनेमा केवळ कन्नडमध्येच बनवणार होते. पण बॉक्स ऑफिसवर याला मिळणारा प्रतिसाद बघता आता तो हिंदी, तामिळ व तेलगू भाषेतही रिलीज करण्यात आला आहे.
‘कांतारा’ची कथाएक राजाने देव मानल्या जाणाऱ्या एका दगडाच्या बदल्यात आपली काही जमीन गावकऱ्यांना दिली होती. आता अनेक वर्षानंतर त्या राजाची पिढी ही जमीन वापस घेऊ इच्छिते. जमीन देण्याचा शब्द फिरवला तर अनर्थ घडेल, हे देवतेने राजाला आधीच बजावलं असतं. अशात राजाचे वंशज राजाने दिलेली जमीन परत घेऊ इच्छितात, दुसरीकडे एक फॉरेस्ट ऑफिसर गावकऱ्यांच्या विरोधात उभा राहतो. गावकरी जंगलाला नुकसान पोहोचवत असल्याचं त्याचं म्हणणं असतं. पण गावकऱ्यांच्या मते, ते जंगलाचे सेवेकरी आहेत आणि जंगलावर त्यांचा अधिकार आहे. या सगळ्या गुंत्यामुळे देवता नाराज होते. पुढे काय घडतं, तीच या चित्रपटाची कथा आहे. ही कथा साऊथ इंडियाच्या तुलू नाडू कल्चरशी संबंधित आहे. कथेत शिवा नावाचा एक हिरो आहे. त्याच्याभोवती चित्रपटाची कथा फिरताना दिसते.