Join us  

Kantara on OTT : बॉक्स ऑफिस गाजवणारा ‘कांतारा’ आता घरबसल्या पाहता येणार, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 10:23 AM

Kantara on OTT : घरबसल्या ओटीटीवर हा सिनेमा बघता येणार, म्हणून तुम्ही आनंदात असालच. पण सोबत एक निराश करणारीही बातमी आहे...

 Kantara on OTT : ‘कांतारा’  ( Kantara ) हा सिनेमा आला आणि या सिनेमानं जादू केली. सिनेमा तसा कन्नड. पण रिलीज होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धमाका केला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून काही दिवसांनी ‘कांतारा’ हिंदीसह मल्याळ व तेलगू भाषेत डब करून रिलीज करण्यात आला. दिग्दर्शक व अभिनेता ऋषभ शेट्टीच्या  या सिनेमानं  केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांवर गारुड केलं आहे. जगभरात या चित्रपटाने 400 कोटींची कमाई केली. अजूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचतान दिसतोय. आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. घरबसल्या ओटीटीवर हा सिनेमा बघता येणार, म्हणून तुम्ही आनंदात असालच. पण सोबत एक निराश करणारीही बातमी आहे. 

आज 24 नोव्हेंबरला अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा सिनेमा तुम्हाला बघता येणार आहे.   खरं तर गेल्या आठवड्यातच हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार होता. पण चित्रपट थिएटरमध्ये अद्यापही गर्दी खेचतोय म्हटल्यावर याची ओटीटी रिलज डेट लांबणीवर टाकण्यात आली होती. अखेर आज हा सिनेमा अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाला. पण यातही एक ट्विस्ट आहे.

होय, ट्विस्ट हा आहे की, ‘कांतारा’ फक्त तामिळ, तेलगू , कन्नड व मल्याळम भाषेतच ओटीटीवर रिलीज झाला आहे. अजूनतरी हा चित्रपट हिंदी भाषेत ओटीटीवर उपलब्ध नाहीये. हिंदी डब व्हर्जन ओटीटीवर कधी येणार याची अद्याप तरी घोषणा झालेली नाही. 

‘कांतारा’ हा सिनेमा गेल्या 30 सप्टेंबरला रिलीज झाला होता. सर्वप्रथम फक्त कन्नड भाषेत हा सिनेमा रिलीज झाला होता. पहिल्याच दिवशी या सिनेमाने 1.98 कोटींचा गल्ला जमवला होता. कन्नड व्हर्जनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय म्हटल्यावर 14 दिवसांनंतर हा सिनेमा हिंदी, तामिळ व तेलगूत डब करून रिलीज केला गेला होता. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 82 कोटींची कमाई केली तर तेलगू व्हर्जनने 42 कोटी कमावले. जगभर या चित्रपटाने 400 कोटींपार बिझनेस केला. 

‘कांतारा’ हा सिनेमा दक्षिण भारतातील परंपरा, ग्रामदैवत आणि तिथल्या आदिवासी लोकांची श्रद्धा यावर आधारित आहे. ऋषभ शेट्टीने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे आणि तोच या चित्रपटाचा हिरो आहे.

टॅग्स :Tollywoodअ‍ॅमेझॉन