Join us

'सेटल कधी होणार?' कपिल शर्माने थेटच विचारला प्रश्न; बघण्यासारखा झाला परफेक्शनिस्टचा चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:58 IST

आमिर खान अनेकदा लग्न आणि घटस्फोट यामुळे चर्चेत असतो.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' आता टीव्हीवर नाही तर नेटफ्लिक्सवर प्रसारित होत आहे. आगामी एपिसोडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान (Aamir Khan)दिसणार आहे. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याची विनोदी बाजू यामध्ये पाहायला मिळणार आहे. आमिर खानने स्वत:च्याच फ्लॉप सिनेमांची, फॅशन सेन्सची खिल्ली उडवली आहे. पण प्रोमोचा शेवट फारच इंटरेस्टिंग आहे. 

आमिर खान अनेकदा लग्न आणि घटस्फोट यामुळे चर्चेत असतो. काही वर्षांपूर्वी त्याचा दुसरा घटस्फोट झाला. दिग्दर्शक किरण रावसोबत त्याचा काडीमोड झाला. यानंतर आमिरचे गेले काही चित्रपटही फ्लॉप झाले. कपिल शर्माच्या शोमध्ये मात्र आमिरचा एकदम मजेशीर मूडमध्ये दिसला. अर्चना पूरण सिंहने त्याला 'तू तर आज चांगले कपडे घातलेत की?' असं विचारलं. यावर आमिर म्हणाला, 'मी खरंतर शॉर्ट्सवर येणार होतो पण माझ्या मुलांनी मला जीन्स घालायला सांगितलं.'

प्रोमोच्या शेवटी कपिल शर्मा जे विचारतो ते ऐकून मात्र आमिरचा चेहरा बघण्यासारखा होतो. कपिल त्याला मजेतच विचारतो,'तू सेटल कधी होणार?' यावर आमिर खाली मान घालून फक्त हसतो. आता तो याचं काय उत्तर देणार हे एपिसोड पाहिल्यावरच कळेल.  

आमिर खान आगामी 'सितारे जमीन पर' मध्ये दिसणार आहे. 'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर आता तो या सिनेमात काम करत आहे. 'तारे जमीन पर' मधला ईशान म्हणजेच दर्शिल सफारीही पुन्हा आमिरसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :कपिल शर्मा आमिर खाननेटफ्लिक्सलग्न