Join us

‘आशिकी’ चित्रपटाच्या निर्मितीमागचा एक इंटरेस्टिंग किस्सा, वाचाच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 10:45 AM

होय, महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा चित्रपट आजही ओळखला जातो ते त्याच्या सुपरडुपर हिट गाण्यांसाठी. या चित्रपटाची गाणी आजही चाहत्यांच्या कानात रूंजी घालतात. पण या चित्रपटाच्या आणि चित्रपटांच्या गाण्यांच्यामागे एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा आहे.

ठळक मुद्दे ‘आशिकी’मधील ज्या गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले, ती गाणी प्रत्यक्षात एका म्युझिक अल्बमसाठी लिहिली गेली होती.

एकीकडे पार्श्वगायक कुमार सानू यांनी बॉलिवूडला एकापेक्षा एक हिट गाणी दिलीत. दुसरीकडे गीतकार समीर अंजान यांनी लिहिलेल्या गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कुमार सानू आणि समीर अंजान या दिग्गज जोडीने काल कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये हजेरी लावली. आपल्या करिअरमधील अनेक किस्से त्यांनी यावेळी ऐकवले. यातलाच एक किस्सा म्हणजे, ‘आशिकी’ या चित्रपटाच्या निर्मितीचा.

होय, महेश भट्ट दिग्दर्शित ‘आशिकी’ हा चित्रपट आजही ओळखला जातो ते त्याच्या सुपरडुपर हिट गाण्यांसाठी. या चित्रपटाची गाणी आजही चाहत्यांच्या कानात रूंजी घालतात. पण या चित्रपटाच्या आणि चित्रपटांच्या गाण्यांच्यामागे एक अतिशय इंटरेस्टिंग किस्सा आहे. होय, ‘आशिकी’मधील ज्या गाण्यांना लोकांनी डोक्यावर घेतले, ती गाणी प्रत्यक्षात एका म्युझिक अल्बमसाठी लिहिली गेली होती. होय, गुलशन कुमार यांना एक म्युझिक अल्बम बनवायचा होता. समीर यांना त्यांनी या म्युझिक अल्बमसाठी काही गाणी लिहायला सांगितली. ही गाणी तयार झालीत, रेकॉर्डही झालीत. गाणी तयार झाल्यानंतर गुलशन कुमार यांना ती प्रचंड आवडलीत. त्यांनी ती महेश भट यांना ऐकवलीत. महेश भट यांना तर या गाण्यांनी अक्षरश: वेड लावले. त्यांनी लगेच या गाण्यांभोवती गुंफणारी कथा लिहून चित्रपट बनवण्याची घोषणा केली.

या चित्रपटाला त्यांनी ‘आशिकी’ असे नाव दिले. हा चित्रपट तयारही झाला. पण अचानक गुलशन कुमार यांनी हा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला. कारण  त्यांची रूची केवळ म्युझिक अल्बममध्ये होती. लोकांनी चित्रपटातील गाणी एखाद्या म्युझिक अल्बमची असल्यासारखी वाटत आहेत. त्यामुळे मीया गाण्यांचा म्युझिक अल्बम तयार करणार, असे त्यांनी समीर यांना कळवून टाकले. समीर यांनी लगेच ही गोष्ट महेश भट यांना कळवली. यानंतर महेश भट, समीर दोघेही गुलशन कुमार यांच्या आॅफिसमध्ये पोहोचलेत. महेश भट यांनी गुलशन कुमार यांना समजवण्याचा प्रयत्न केला. ‘आशिकी’ आणि या चित्रपटातील गाणी हिट होणार, चित्रपट कधी नव्हे इतका हिट होणार, असे त्यांनी गुलशन कुमार यांना सांगितले. पण गुलशन कुमार मानेनात.

अखेर चित्रपट सुपरडुपर हिट झाला नाही तर मी दिग्दर्शन करणे सोडून देईल, असे महेश भट गुलशन कुमार यांना सांगितले. गुलशन कुमार यांना त्यांनी तसे को-या कागदावर लिहूनही दिले. तेव्हाकुठे गुलशन कुमार ‘आशिकी’ प्रदर्शित करायलातयार झालेत. केवळ इतकेच नाही तर मी हा चित्रपट नुसता प्रोड्यूस करणार नाही तर त्याचे मोठ्या प्रमाणात मार्केटींग करेल, असेही त्यांनी जाहीर करून टाकले. तेव्हा कुठे आशिकी प्रदर्शित झाला. पुढे या चित्रपटाने इतिहास रचला.

टॅग्स :कपिल शर्मा महेश भटकुमार सानू