Join us  

कपिल शर्माने घेतला अक्षय कुमारसोबतचा जुना 'बदला', हिसकावून घेतला खिलाडीचा हा प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 2:20 PM

Kapil Sharma : कपिल शर्मा सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. नुकताच त्याने त्याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) शोमध्ये दिसला किंवा नसो तो नेहमीच चर्चेत असतो. त्याची फनी स्टाइल प्रत्येक वेळी त्याच्या चाहत्यांची मने जिंकते. कधी तो त्याच्या शोजमुळे तर कधी त्याच्या फॅशनमुळे चर्चेत असतो. कपिल शर्माच्या शोमध्ये सर्वाधिक वेळा कोणी आला असेल तर तो अक्षय कुमार (Akshay Kumar) असेल. अक्षय नेहमी त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोमध्ये यायचा. जिथे दोघांनी एकमेकांसोबत मस्ती केली. कपिल नेहमीच अक्षयला खूप प्रोजेक्ट्स करत असल्याचा टोमणा मारत असतो. इतकंच नाही तर त्याने एकदा अक्षयवर जाहिरात हिसकावून घेतल्याचा आरोप केला होता. आता कपिलने अक्षयचा बदला घेतला आहे.

खरंतर कपिल शर्माने याआधी एक जाहिरात केली होती ज्यात अक्षय कुमार दिसला होता. आता कपिलने ही जाहिरात मागे घेतली होती. पॉलिसीची एक नवीन जाहिरात समोर आली आहे ज्यामध्ये कपिल शर्मा दिसत आहे. या जाहिरातीत कपिलसोबत इन्फ्लुएंसर अगु स्टॅनलीही दिसत आहे. अक्षय कुमार एकदा द कपिल शर्मा शोमध्ये त्याच्या सूर्यवंशी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता. जिथे कपिलने अक्षयची त्याच्या कामाबद्दल खिल्ली उडवली. कपिल म्हणाला होता की, ८ चित्रपटांशिवाय माझ्यासारखा दुसरा एखादा छोटा अॅड फिल्म करत असेल तर त्याच्या जाहिरातीही हिसकावून घेतल्या जातात.

कपिलने अक्षयवर आरोप केले होतेकपिल पुढे सांगतो की, एक जाहिरात केली होती, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. मी म्हटलं ठीक आहे, पुढच्या वर्षी पुन्हा फोन येईल. पुढच्या वर्षी मी पाहिले की तो यमराजाची टोपी घालून म्हणतो की तुमची पॉलिसी पूर्ण करा.

वर्कफ्रंट...वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कपिल काही वेळापूर्वीच आंतरराष्ट्रीय लाइव्ह टूरवरून परतला आहे. त्याचा शो यावर्षी बंद झाला. कपिल लवकरच नव्या सीझनसह परतणार आहे.

टॅग्स :कपिल शर्मा अक्षय कुमार