Join us

​ रात्रीच्या अंधारात कपिल शर्माचे नवे ‘कांड’! लोकांनी पाजलेत उपदेशाचे डोस!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 9:38 AM

सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे. कपिलच्या ‘फॅमिली विद कपिल शर्मा’ नामक अपकमिंग शोचा टीजरही रिलीज झाला आहे. कपिल यामुळे चर्चेत आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.

सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर कपिल शर्मा पुन्हा एकदा टीव्हीवर परतणार आहे. कपिलच्या ‘फॅमिली विद कपिल शर्मा’ नामक अपकमिंग शोचा टीजरही रिलीज झाला आहे. कपिल यामुळे चर्चेत आहे, असे तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे. सध्या कपिल एका वेगळ्याच ‘कांडा’मुळे चर्चेत आलाय. होय, अलीकडे कपिल अमृतसरमध्ये बाईक राईट करताना दिसला. अंधारी रात्र, अंगात जॅकेट आणि डोक्यावर टोपी अशा अंदाजात कपिल अमृतसरच्या रस्त्यांवर दिसतो आहे. बाईकवरून फिरताना आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणी तो शेअर करतोय. या व्हिडिओवर लाईक्सचा पाऊस पडेल, असा काहीसा कपिलचा अंदाज असावा. पण झाले काही तरी भलतेच. या व्हिडिओवरून कपिल चक्क ट्रोल झाला. डोक्यावर हेल्मेट नसल्याने लोकांनी त्याला चांगलेच सुनावले. ‘सरजी, हेल्मेट नहीं है...संभालो मीडिया को,’ असे एका युजरने कपिलला उद्देशून लिहिले. अन्य एका युजरने ‘सर हेल्मेट घाला,’ असे सांगत कपिलच्या चुकीवर नेमके बोट ठेवले. काही युजर तर यानिमित्ताने कपिलची खिल्ली उडवतानाही दिसले. ‘नंबर प्लेट पर पुलिस लिखा है, भाई किसकी उठा ली,’ असे एकाने लिहिले. एकंदर काय तर कपिलच्या विना हेल्मेट गाडी चालवण्यावरून लोकांनी त्याला चांगलेच उपदेशाचे डोस पाजलेत.ALSO READ : गर्लफ्रेन्ड गिन्नीसोबत लग्न करावे की नाही? ​कपिल शर्मा कन्फ्युज्डकपिलचा हा व्हिडिओ पहिल्या दोन तासांत २ लाख लोकांनी बघितला आहे.  गत वर्षभरात कपिलच्या करिअरची गाडी रूळावर घसरली होती. आधी कपिलचा सुनील ग्रोवरसोबत वाद झाला होता. सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी घसरला होता. त्यातून कसाबसा सावरत नाही तोच कपिलला  आजारपणाने  घेरले होते. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले होते.  अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला होता. यानंतर कपिलने ‘फिरंगी’ हा चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा चित्रपटही जोरात आपटला होता. ‘फिरंगी’च्या अपयशाने कपिल पुन्हा एकदा डिप्रेशनमध्ये गेल्याचेही मध्यंतरी ऐकिवात आले होते.