कपिल शर्माच्या नव्या शोने केली चाहत्यांची निराशा! सोशल मीडियावर अशा दिल्या प्रतिक्रिया!!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 4:46 AM
आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसविण्यासाठी कपिल शर्मा काल छोट्या पडद्यावर परतला. कपिल मोठ्या ब्रेकनंंतर छोट्या पडद्यावर परणार म्हटल्यावर ...
आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून हसविण्यासाठी कपिल शर्मा काल छोट्या पडद्यावर परतला. कपिल मोठ्या ब्रेकनंंतर छोट्या पडद्यावर परणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांना प्रचंड अपेक्षा होत्या. कपिलचा नवा कोरा ‘फॅमिली टाईम विद कपिल शर्मा’ पाहण्यास लोक उत्सूक होते. त्यानुसार, काल कपिलच्या पहिल्या शोचे प्रसारण झाले. या गेम शोमध्ये कपिलने आधीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केलायं. पण प्रेक्षकांना मात्र कपिलच्या शोमधील हे वेगळेपणं फार आवडल्याचे दिसले नाही. होय, सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया बघता, कपिलच्या या नव्या शोने प्रेक्षकांची निराशाचं केली, असे दिसतेय. अनेक चाहत्यांनी कपिलचा नवा शो पाहून नाके मुरडली. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’च्या तुलनेत कपिलचा हा नवा शो जाम कंटाळवाणा आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.आधीच्या शोमध्ये कपिल सेलिब्रिटींसोबत गप्पा मारतांना, त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतांना दिसायचा. याऊलट नव्या शोमध्ये तो सेलिब्रिटींना गेम खेळवतांना दिसतोय. बक्षिसांची खैरात करणारा हा गेम शो तरिही लोकांना आवडलेला नाही. अनेक लोकांनी या शोची तुलना ‘खुलजा सिम सिम’ या जुन्या शोसोबत करून केली आहे. ‘फारचं निराशाजनक, पहिल्यांदा कपिलचा शो पाहतांना मी चॅनल बदलले. जुना शो यापेक्षा कितीतरी सरस होता,’ असे एका चाहत्याने लिहिले. एका चाहतीने कपिलचा नवा शो मनोरंजनाच्या लायकीचा नसल्याची रोखटोक प्रतिक्रिया दिली. एकंदर काय, तर आपल्या नव्या शोवर चाहत्यांच्या अशा प्रतिक्रिया मिळतील, याची कपिलनेही अपेक्षा केली नसावी. गतवर्षभरात कपिल कायम चुकीच्या कारणाने चर्चेत आहे. आधी सुनील ग्रोवरसोबत कपिलचा वाद झाला होता. या वादानंतर सुनील शो सोडून गेला आणि कपिलच्या शोचा टीआरपी अचानक घसरला. त्यातून कसाबसा सावरत नाही, तोच कपिलला आजारपणाने घेरले. डिप्रेशन, वाढते ब्लडप्रेशर, ताण अशा सगळ्यांमुळे कपिलच्या शोचे शूट वारंवार रद्द होऊ लागले. अखेर कपिलचा शो आॅफ एअर करण्याचा निर्णय संबंधित चॅनलने घेतला. यानंतर कपिलने ‘फिरंगी’ हा चित्रपटातून कमबॅक करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याचा हा चित्रपटही जोरात आपटला होता.