पाकिस्तानची सीमा हैदर (Seema Haider)आणि भारताचा सचिन मीना (Sachin Meena) यांची लव्हस्टोरी मध्यंतरी चर्चेत आली होती. या लव्हस्टोरीने दोन्ही देशांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पबजी खेळताना हे दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. सचिनच्या प्रेमाखातर सीमा हैदर आपला देश सोडून कायमची भारतात आली. सीमाला दोन मुलंही आहेत मात्र तिने आपल्या कुटुंबाला सोडत भारत देश गाठला. या अजब लव्हस्टोरीवर आता 'कराची टू नोएडा' हा सिनेमा येतोय. सिनेमाचा टीझर नुकताच रिलीज झालाय.
निर्माते अमित जानी यांच्या 'कराची टू नोएडा' सिनेमाचा ३ मिनिटांचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या ३ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सीमा हैदरच्या भूमिकेचं नाव सायमा हैदर आणि गुलाम हैदरचं एहसान खान आहे. ट्रेलरमधील डायलॉग्सने धुमाकूळ घातला आहे ज्यामुळे वादही होऊ शकतात. सीमा हैदर आयएसआय एजंट नाही तर रॉ ची एजंट दाखवण्यात आली आहे. जेव्हा याबद्दल पाकिस्तानला कळतं तेव्हा चांगलाच गोंधळ उडतो. तर पाकिस्तानात खुलासा होण्याआधी सीमा भारतात पळून येते आणि लोकांमध्ये मिसळते.
जयंत सिन्हा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री फरहीन फलरने सीमा हैदरची भूमिका केली आहे. तर सचिन मीनाच्या रोलमध्ये अभिनेता आदित्य राघव झळकला आहे. इतर स्टारकास्टबद्दल सांगायचं तर 'गदर 2' मधील मेजर मलिक रोहित चौधरी या सिनेमात पोलिस कमिशनरच्या भूमिकेत आहे.