बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) यांचा नातू आणि सनी देओलचा मुलगा करण देओल (Karan Deol) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. नुकतेच करणने गर्लफ्रेंड द्रिशासोबत साखरपुडा केल्याची बातमी समोर आली आहे. द्रिषा ही दिवंगत चित्रपट निर्माते बिमल रॉय यांची नात आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसते आहे.
धर्मेंद्र यांच्या अचानक बिघडलेल्या तब्येतीमुळे सनी देओलने मुलगा करण आणि द्रिषाचा गुपचूप साखरपुडा केला. ज्यामध्ये केवळ कुटुंबातील सदस्यांचा समावेश होता. दोन्ही कुटुंबात त्यांच्या लग्नाची तयारीही जोरात सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. धर्मेंद्र यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांचे लग्न लवकरात लवकर पार पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली असून ते घरी आले आहेत. कुटुंबीय त्याची पूर्ण काळजी घेत आहेत.