गत बुधवारी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘केसरी’चे पहिले गाणे ‘सानू केहंदी’ रिलीज झालेत. अक्षयने स्वत: त्याच्या सोशल अकाऊंटवर हे गाणे शेअर केले. अक्षयपाठोपाठ ‘केसरी’चा निर्माता करण जोहर यानेही हे गाणे शेअर केले. पण युजर्सला मात्र हे आवडले नाही. भारत-पाकिस्तान सीमेवर तणावाची स्थिती असताना अक्षय व करणने आपल्या चित्रपटाच्या गाण्याला प्रमोट करणे, चाहत्यांना जराही रूचले नाही. परिणामी युजर्सनी दोघांनाही ट्रोल केले.
‘देख भाई, माना कि हम तुम्हारी फॅन है. लेकिन देश में गरम माहौल चल रहा है और तुम सॉन्ग प्रमोट करने में लगे हुए हो,’ असे लिहित एका चाहत्याने आपली नाराजी बोलून दाखवली. १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारित असलेल्या ‘केसरी’ या चित्रपटात अक्षयने ईशर सिंगची भूमिका साकारली आहे. आपल्या २१ सैनिकांना घेऊन ईशर सिंग १० हजार अफगाणी सैन्याशी भीडतो. येत्या २१ मार्चला होळीच्या मुहूर्तावर अक्षयचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सन १८९७ मध्ये सारागढीचे युद्ध झाले होते. ब्रिटिश इंडियन आमीर्साठी लढणाºया ३६ शीख रेजिमेंटने या युद्धात आपल्या शौयार्ची ओळख करून दिली होती. आपल्या २१ सैनिकांना घेऊन ईशर सिंगने १० हजार अफगाणी सैन्याला दोन वेळा पराभूत केले होते. दुदैर्वाने तिसºया वेळेस त्याचा पराभव झाला पण ब्रिटिश आर्मी येईपर्यंत त्यांनी १० हजार सैन्याला थोपवून ठेवले होते.