Join us

‘डॅडी’ दिग्दर्शकामधील रिअल ‘डॅडी’, जुळ्या मुलांच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त करण जोहरकडून जंगी पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 2:54 PM

२०१७ साली करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालकत्त्व स्विकारले होते.यश आणि रुही या जुळ्यांचं करणच्या आयुष्यात आगमन झालं होतं.

बी- टाऊनमध्ये सध्या तैमूर अली खानची जास्त चर्चा आणि बातम्या ऐकायला मिळतात. मात्र यश-रुही, अबराम, आराध्या बच्चन, मिशा कपूर, सनी लिओनीची जुळी मुलं नोहा आणि आशेर हेही काही कमी नाहीत. एकूणच काय तर स्टार कलाकारांसह माध्यमांच्या नजरा या स्टार किड्सच्या प्रत्येक लहानसहान गोष्टी आणि बाललीलांवर खिळलेल्या असतात. स्टार किड्स म्हटलं की पार्ट्या, सेलिब्रेशन आणि धम्माल मस्ती ओघाने आलीच. अशीच एक शानदार पार्टी चित्रपटसृष्टीचा डॅडी दिग्दर्शक करण जोहरने आयोजित केली आहे. निमित्त आहे त्याच्या जुळ्या मुलांच्या दुसऱ्या वाढदिवसाचे. २०१७ साली करण जोहर सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांचे पालकत्त्व स्विकारले होते.यश आणि रुही या जुळ्यांचं करणच्या आयुष्यात आगमन झालं होतं.

 ७ फेब्रुवारी हा दोघांचा जन्मदिवस. त्यामुळे डॅडी केजोने आपल्या घरी जंगी पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला चित्रपटसृष्टीची स्टार किड्स अर्थात बच्चा पार्टीला आमंत्रित करण्यात आले आहे.यांत छोटे नवाब सैफ आणि बेगम करीनाचा लाडका तैमूर, शाहीद-मीराची दोन्ही मुलं, सोहा अली खानची लेक इनाया, तुषार कपूरचा लेक लक्ष्य आणि अर्पिता खानचा लेक आहिल यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे. गेल्या वर्षी यश आणि रुहीच्या पहिल्या वाढदिवसाच्या निमित्तानेही करणने जंगी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत दिग्गज सेलिब्रिटी सहभागी झाले होते. त्यामुळे यश आणि रुहीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या पार्टीला करणने काही खास सरप्राईज प्लान केले आहे का याची उत्सुकता लागली आहे. 

काही दिवसांपूर्वी कॉफी विथ करण शोमध्ये हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुलचा सहभाग असलेल्या भागात महिलांबाबत वादग्रस्त विधान करण्यात आलं होतं. त्यामुळे करणला माफीसुद्धा मागावी लागली होती. आता हे सगळे विसरुन आपल्या मुलांच्या वाढदिवसासाठी करण उत्सुक आहे. याशिवाय लवकरच करणचा 'तख्त' सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. रणवीर सिंह, करीना कपूर, आलिया भट्ट, अनिल कपूर, जान्हवी कपूर, विक्की कौशल अशी बडी स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :करण जोहर