करण जोहर तर डेव्हिड धवनपेक्षाही जळकुटा माणूस : गोविंदा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 5:46 AM
नव्वदच्या दशकातील ‘हीरो नं. १’ गोविंदाने दिग्दर्शक करण जोहर आणि डेव्हिड धवन यांच्यावर जहरी टीका करताना म्हटले की, ‘करण ...
नव्वदच्या दशकातील ‘हीरो नं. १’ गोविंदाने दिग्दर्शक करण जोहर आणि डेव्हिड धवन यांच्यावर जहरी टीका करताना म्हटले की, ‘करण जोहर जसे लोकांना दाखवतो तसा मुळीच नाही. तो तर मला डेव्हिड धवनपेक्षाही जास्त जळकुटा आणि जास्त धोकादायक वाटतो.’नुकतेच एका मुलाखतीमध्ये जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो ‘कॉफी विथ करण’मध्ये सहभागी होणार का? यावर तो म्हणाला, ‘मला नाही वाटत तो कधी मला बोलवेल. मागच्या ३० वर्षांमध्ये त्याने मला कधीच फोन केला नाही की त्याच्या एखाद्या पार्टीला बोलावले नाही. त्याच्या गु्रपमध्ये नसलेल्या कलाकारांना तर तो ‘हॅला, हाय’सुद्धा म्हणत नाही. तो जे भासवतो की, तो किती चांगला आहे, ते एकदम खोटं आहे. मला तर तो कधीच सरळ माणूस वाटला नाही.’आता गोविंदा असे का म्हणाला? बऱ्याच वर्षांनी उतारवयात करिअरला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी गोविंदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करीत आहे. आगामी ‘आ गया हीरो’ या चित्रपटातून कमबॅक करणार असून त्याला असे वाटतेय की, करण जोहर त्याच्या फिल्मी करिअरला संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी प्रयत्न करतोय.►ALSO READ: काळाप्रमाणे बदल हेच यशाचे सूत्र: गोविंदागोविंदा म्हणाला की, ‘माझ्या करिअरला पुन्हा उभारी न मिळावी म्हणूनच तो माझ्या चित्रपटाच्या केवळ एक आठवड्यानंतर वरुण-आलिया स्टारर ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हा चित्रपट रिलीज करीत आहे. हे सगळे तो ठरवून करीत आहे.’विशेष म्हणजे गोविंदाचा रोष डेव्हिड धवन यांच्यावरही दिसला. गोविंदा आणि डेव्हिड यांनी एकूण १७ चित्रपटांत एकत्र काम केलेले आहे. पण आता दोघांचे संबंध पूर्ण बिघडले असल्याचे कळतेय. कारण गोविंदा म्हणतो की, ‘मी डेव्हिडला माझ्यासोबत आणखी एक चित्रपट बनव अशी अनेक वर्षांपासून विनंती करतोय पण तो आता मला टाळत आहे. सगळे लोक केवळ स्वार्थ पाहतात या इंडस्ट्रीमध्ये.’आता गोविंदासोबत खरंच या दोघांचे काही कारस्थान आहे की, तो केवळ फ्री पब्लिसिटी मिळावी म्हणून असे वादग्रस्त विधान करतोय हेच कळत नाही. तुम्हाला काय वाटते? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा.►ALSO READ: संजय दत्तसाठी करण जोहरने केली होती चिटिंग!