ठळक मुद्देकंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद सगळ्यांनाच ठाऊक आहे. नेपोटिजमच्या मुद्यावरून अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावरून कंगना व करणमध्ये चांगलीच जुंनली होती.
कंगना राणौतचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ आज देशभर प्रदर्शित झाला आणि दुसरीकडे कंगनासाठी एक मोठी बातमी आली. ही बातमी ऐकून कंगनाचे चाहतेही आनंदाने बेभान होतील हे नक्की. होय, ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’च्या रिलीजदरम्यान करण जोहरने कंगनापुढे मैत्रीचा हात पुढे केला आहे. अगदी सगळे काही मतभेद, वाद विसरून कंगनासोबत काम करण्यास करण राजी आहे.
अलीकडे एका मुलाखतीत करण कंगनाबद्दल बोलला. कंगनासोबत काम करण्यास मला काहीही अडचण नाही. मला तिच्यासोबत काम करायला आवडेल. आत्तापर्यंत मी जितके काही चित्रपट दिग्दर्शित केले, त्यात कंगनालायक भूमिका नव्हती. उरली गोष्ट मी निर्मिती केलेल्या चित्रपटाची. तर या चित्रपटांसाठी आजपर्यंत कुण्याही दिग्दर्शकाने माझ्याकडे कंगनाचे नाव पुढे केले नाही. त्यामुळे कंगना माझ्या चित्रपटांत दिसली नाही. आमच्यात मतभेद आहेत, याचा अर्थ आम्ही एकमेकांसोबत काम करणार नाही असा नाही, असे करण यावेळी म्हणाला. यावेळी त्याने अनुराग कश्यपचेही उदाहरण दिले.
अनुराग व माझ्यात काही मतभेद होते. पण तरिही आम्ही एकत्र काम केले. त्यामुळे कंगनाच्या नावावर मला काहीही आक्षेप नाही. स्क्रिप्टची गरज असेल आणि दिग्दर्शक कंगनाला कास्ट करू इच्छित असेल तर मी तिच्या नावाला होकार द्यायला एक क्षणही मागेपुढे पाहणार नाही. शेवटी हा व्यवसाय आहे आणि यात भावनांना स्थान नाही, असेही करण म्हणाला.
कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद सगळ्यांनाच ठाऊक आहे. नेपोटिजमच्या मुद्यावरून अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या मुद्यावरून कंगना व करणमध्ये चांगलीच जुंनली होती. करणच्याच ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये जावून कंगनाने त्याला ‘मुव्ही माफिया’ म्हटले होते. कंगनाचा हा घाव करणच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. तेव्हापासून या मुद्यावर करण व कंगना या दोघांमध्ये चांगलीच तणाताणी सुरु होती. २०१७ मध्ये न्यूयॉर्कमध्ये रंगलेल्या आयफा अवाड सोहळ्यातही याचा एक अध्याय गाजला होता. आयफा अवार्ड होस्ट करणारे सैफ अली खान, वरूण धवन व करण जोहर यांनी या सोहळ्याच्या मंचावर कंगना राणौतला डिवचायची एकही संधी सोडली नव्हती.