पंधरा दिवस होऊ शकणार नाही आलिया-वरूणच्या ‘कलंक’चे शूटींग, हे आहे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 11:47 AM2018-07-26T11:47:09+5:302018-07-26T11:48:52+5:30
करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरु आहे. पण या सेटवरून कायम अपघाताच्या बातम्या येत आहेत.
करण जोहरच्या ‘कलंक’ या चित्रपटाचे शूटींग सध्या जोरात सुरु आहे. पण या सेटवरून कायम अपघाताच्या बातम्या येत आहेत. चित्रपटाच्या सेटवर एका पाठोपाठ एक असे कलाकार जखमी होत असल्याचे पाहून चाहत्यांचीही चिंता वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ‘कलंक’च्या सेटवर अभिनेता वरूण धवन जखमी झाला होता. यानंतर आलिया भट्ट ही सुद्धा शूटींगदरम्यान जखमी झाला होती. आलिया व वरूणपाठोपाठ या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणारा अभिनेता आदित्य रॉय कपूर याला सुद्धा सेटवर एक अॅक्शन सीन देताना अपघात झाला होता. अपघातांच्या या मालिकेनंतर आता या चित्रपटाचा सेट कोसळलाय आणि त्यामुळे धवन आणि आलिया भट्ट स्टारर ‘कलंक’ या चित्रपटाचे शूटींग १५ दिवस लांबणीवर पडलेय.
होय, जोरदार पावासामुळे ‘कलंक’चा अख्खा सेट कोसळला आणि यामुळे चित्रपटाचे शूटींग थांबवावे लागले़. चित्रकुट मैदानावर या चित्रपटाचा सेट साकारण्यात आला होता. येथेच शूटींग सुरु होते. पण मुंबईतील मुसळधार पावसासमोर या सेटचा टिकाव लागला नाही. या सेटवर २० दिवस शूटींग होणार होते. पण आता हे शूटींग रद्द करण्यात आले आहे. आता पुन्हा नव्याने सेट बनल्यानंतर शूटींग सुरू होऊ शकेल.
निमार्ता- दिग्दर्शक करण जोहर व त्याचे वडील यश जोहर यांनी 15 वषार्पूर्वी या चित्रपटाचे नियोजन केले होते. या सिनेमात आधी अभिनेत्री श्रीदेवी या महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार होत्या. पण आता श्रीदेवी यांच्या निधनानंतर अभिनेत्री माधुरी दीक्षित या सिनेमात झळकणार आहे. माधुरीबरोबरच संजय दत्त, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, वरूण धवन, आदित्य रॉय कपूर हे कलाकारही या सिनेमात असतील. ‘कलंक’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री माधुरी दीक्षित व अभिनेता संजय दत्त तब्बल 21 वर्षांनी एकत्र काम करणार आहेत.
अभिषेक वर्मन या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून सिनेमात 1940 च्या दशकातील कहाणी दाखविली जाणार आहे.‘कलंक’या सिनेमाची कल्पना 15 वर्षाआधी सुचली होती. या सिनेमाचं प्री-प्रोडक्शन माझ्या वडिलांनी सुरू केलं होतं. आता हा सिनेमा अभिषेक वर्मनकडे देताना मला खूप आनंद होतो आहे, असं करण जोहरने ट्विट करत म्हटलं होतं. ‘कलंक’ या सिनेमाचं नाव ‘शिद्दत’ असेल असं आधी बोलल जात होतं. पण करण जोहरनेच याबद्दलचं स्पष्टीकरण देत सिनेमाचं नाव ‘शिद्दत’ नसून ‘कलंक’ आसल्याचं सांगितलं होतं.