दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर आज आपला वाढदिवस साजरा करतो आहे. गेल्या काही वर्षांत करणने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमा दिले आहेत. आज करण त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करतो आहे. करण जोहरने अनेकवेळा जाहीरपणे मान्य केले आहे की तो कोणावर तरी प्रेम करत असे, ती एक बॉलिवूड अभिनेत्री होती आणि त्याने त्या अभिनेत्रीवर आपलं प्रेमही व्यक्त केले होतं. करणच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्याच्या लव्हलाईफ बाबत सांगणार आहोत.
करण जोहरने अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की त्याने त्याच्या आयुष्यात एकच मुलीवर प्रेम केलं आहे, जिला तो लहानपणापासून ओळखत होता. करण जोहरची प्रिय व्यक्ती, ती एक अभिनेत्री आहे आणि आज ती एका मोठ्या सुपरस्टारची पत्नी देखील आहे. ती अभिनेत्री आहे खिलाडी कुमारची पत्नी ट्विंकल खना होय, करण जोहर आणि ट्विंकल लहानपणापासूनचे मित्र. ट्विंकलने करणला मित्रापेक्षा फार काही मानलं नाही. पण करण मात्र ट्विंकलवर अक्षरश: फिदा होता. अगदी तिच्यासोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती. ही गोष्ट अक्षय कुमारलाही माहित होती. ‘कॉफी विद करण’ या करणच्याच शोमध्ये यावरून अक्षय करणची मस्करी करतानाही दिसला होता.
खुद्द ट्विंकलने ‘मिस फनीबोन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी करण आणि तिच्या नात्याबद्दल, त्यांच्या मैत्रीबद्दल सांगितलं होतं. करण जोहरला आवडलेली मी एकमेव मुलगी होती. करणने त्याच्या प्रेमाची कबुली देखील दिली होती, असं तिनं सांगितलं होतं.
ती म्हणाली होती,‘ करण व मी आम्ही दोघेजण एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत होतो. करणला खूप भूक लागत असल्याने कँटीनमधून काही तरी खायला घेऊन ये, असं तो सांगायचा आणि मी कँटीनमधून खायचे पदार्थ चोरून आणायचे. करणला बोर्डिंगमध्ये राहायला आवडायचं नाही. एकदा त्यानं बोर्डिंगमधून पळून जाण्याचाही विचार केला होता. त्यावेळी मी त्याला बोर्डिंगच्या मागे असलेल्या डोंगरावरून उडी मार आणि पळून जा असं सांगितलं होतं. खास म्हणजे, मी सांगितलं ते त्यानं केलंही होतं आणि यामुळे सर्वांसमोर त्याला शिक्षाही झाली होती.’
टीनाच हवी होती... ट्विंकलला सर्वजण टीना या नावानं हाक मारायचे. त्यामुळे करणने ‘कुछ कुछ होता है’ हा सिनेमा केला तेव्हा त्याने जाणीवपूर्वक एका नायिकेला टीना हे नाव दिलं होतं आणि ही भूमिका ट्विंकलनेच करावी, अशी त्याची भरून इच्छा होती. परंतु ट्विंकल या सिनेमात काम करायला नकार दिल्याने अखेर त्याने ही भूमिका रानी मुखर्जी दिली होती.