Join us

करण जोहरने ४ महिन्यांत १७ किलो वजन कसं घटवलं? औषध घेतलं? अखेर खुलासा केलाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:39 IST

करणने त्याचं वजन कमी करण्याचं सिक्रेट सांगितलं आहे.

Karan Johar Opens Up About His Weight Loss: बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) सर्वाधिक चर्चेत असणारं नाव आहे. करणने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तो आपल्या बिनधास्त आणि बोल्ड स्टाइलसाठी ओळखला जातो. सध्या करण जोहर  एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. अलीकडेच त्याने जयपूरमध्ये पार पडलेल्या  'आयफा पुरस्कार २०२५' ( Iifa Awards 2025) सोहळ्याला उपस्थिती लावली. ज्यामध्ये तो स्लिम दिसत होता.  करण जोहरने ४ महिन्यांत १७ किलो वजन कमी केले आहे. पण त्याने हे केले तरी कसं हा प्रश्न चाहत्यांनी पडला आहे.

करण जोहरने असं काय केलं, की त्याच वजन कमी झालं, हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. आता करणने त्याचं वजन कमी करण्याचं सिक्रेट सांगितलं आहे. माध्यमांशी बोलताना तो म्हणाला, "योग आणि योग्य आहार हे निरोगी राहण्यासाठी आणि चांगले दिसण्यासाठी सर्वोत्तम आहे. यातूनच मी स्वतःला बदललं आहे".

करण जोहरच्या फिटनेस ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकजण थक्क झाले.  'फॅब्युलस लाईव्हज ऑफ बॉलिवूड वाइव्हज' या शोमध्ये अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरने ओझेम्पिक सारख्या औषधाचा उल्लेखही केला होता. यानंतर लोकांनी करण जोहरनेही याच औषधाचा वापर करत वजन कमी केल्याचा आरोप केले होते. वजन कमी करण्यासाठी करणने ओझेम्पिक औषध घेतल्याचा दावा अनेकांनी केला. पण, करणने स्वतः पुढे येत या अफवांचे खंडन केलं. वजन कमी करण्यासाठी कोणतेही औषध घेतले नसून निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्याचं त्यानं सांगितलं. 

टॅग्स :करण जोहरसेलिब्रिटीबॉलिवूडफिटनेस टिप्स