Join us

करण जोहर सोशल मीडियावर का मागतोय माफी? उत्तर हवे असेल तर वाचा बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 10:00 AM

अचानक करण ट्विटरवर माफी मागू लागला आणि चाहते हैराण झालेत.

ठळक मुद्देलाखो लोक कोरोनामुळे ना ना प्रकारच्या वेदना सहन करत असताना आपण मात्र आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन घडवण्यात मश्गुल आहोत, याची जाणीव करणला कुठेतरी झाली असावी.

कोरोना व्हायरसचा प्रकोप आणि लॉकडाऊन यामुळे मनोरंजन जगतातील सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर कमालीचे अ‍ॅक्टिव्ह दिसत आहेत. बॉलिवूडचा दिग्गज निर्माता व दिग्दर्शक करण जोहर हाही लॉकडाऊनच्या काळात आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय. पण हे काय? अचानक करण ट्विटरवर माफी मागू लागला आणि चाहते हैराण झालेत. आता करण माफी का मागतोय, हे जाणून घ्यायचे असेल तर पुढची बातमी तुम्ही वाचायलाच हवी.

करण म्हणतो...करणने ट्विटरवर एक पोस्ट लिहून क्षमायाचना केली. त्याने लिहिले, ‘मी अंतर्बाह्य हादरलो आहे. याचे कारण म्हणजे माझ्या अनेक पोस्ट लोकांसाठी असंवेदनशील आहेत, याची जाणीव मला झालीय. त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो. मात्र मी हे जाणीवपूर्वक केलेले नाही. पण हो, या पोस्ट शेअर करताना मी चुकलो, हे स्पष्ट आहे, मी माफी मागतो,’ असे करणने लिहिले.

का करणला होतोय पश्चातापकरणने माफी मागावी, अशी कोणती असंवेदनशील पोस्ट त्याने केली,असा प्रश्न यानंतरही तुम्हाला पडू शकतो. तर त्याचे उत्तर या व्हिडीओत आहे. या व्हिडीओत सेलिब्रिटींवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. होय, एकीकडे डॉक्टर, नर्स असे सगळे कोरोनाच्या संकटाशी लढत आहेत. काहींनी कोरोनामुळे आपल्या जवळच्यांना गमावलेले आहे. एकीकडे  लाखो लोक कोरोनामुळे प्रभावित झाले आहेत तर दुसरीकडे काही सेलिब्रिटी स्वत:चे शानदार लाईफ व त्याच्याशी संबंधित त्याचे व्हिडीओ पोस्ट करत आहेत. या व्हिडीओत अशा सेलिब्रिटींवर टीका करण्यात आली आहे. खरे तर या व्हिडीओ कुठेही करण जोहरचा उल्लेख नाही. यात केवळ हॉलिवूड सेलिब्रिटी दिसत आहेत. पण तरीही हा व्हिडीओ पाहताच करणला त्याची चूक उमगली. कारण लॉकडाऊनच्या काळात, करणने आपल्या मुलांसोबतचे काही व्हिडीओ शेअर केले होते. यात करण डिझाईनर कपड्यांमध्ये दिसला होता. लाखो लोक कोरोनामुळे ना ना प्रकारच्या वेदना सहन करत असताना आपण मात्र आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन घडवण्यात मश्गुल आहोत, याची जाणीव करणला कुठेतरी झाली असावी. त्याने माफी मागितली ती त्याचसाठी....

टॅग्स :करण जोहरकोरोना वायरस बातम्या