Join us

Bollywood vs South Film: आम्ही असा सिनेमा बनवला असता तर आमचं..., ‘KGF 2’वर बोलला करण जोहर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 1:10 PM

Bollywood vs South Film: अलीकडच्या काळात साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला. साऊथ विरूद्ध बॉलिवूड असा संघर्षही पाहायला मिळाला. आता या वादात बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानेही उडी घेतली आहे.

Bollywood vs South Film: अलीकडच्या काळात साऊथच्या सिनेमांनी बॉलिवूडला घाम फोडला. साऊथच्या चित्रपटांनी बॉलिवूडच्या प्रेक्षकांना आपलेसं केलं.  पुष्पा, आरआरआर, केजीएफ 2 ही त्याची काही ताजी उदाहरणं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई करत, बॉलिवूडच्या अनेक रथी महारथींना मागे टाकलं. साऊथ विरूद्ध बॉलिवूड असा संघर्षही यानिमित्तानं पाहायला मिळाला. आता या वादात बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर यानेही उडी घेतली आहे. एका मीडिया आऊटलेटला दिलेल्या मुलाखतीत करण जोहर (Karan Johar) यावर बोलला. साऊथच्या तुलनेत बॉलिवूडच्या दिग्दर्शकांना अनेक मर्यादा असल्याचं तो म्हणाला. यासाठी त्याने केजीएफचं उदाहरण दिलं. 

 बॉलिवूडनं केजीएफ बनवला असता तर आम्हाला...केजीएफ 2 आणि आरआरआर सारख्या जगभर 1000 कोटींवर बिझनेस करणाऱ्या सिनेमांचं कौतुक करायला हवंच. मला स्वत:ला सुद्धा हे सिनेमे आवडले. पण बॉलिवूडमध्ये आमच्यापैकी केजीएफ सारखा असा सिनेमा बनवला असता तर तो नक्कीच बॅन झाला असता. केजीएफ 2 सारखे संवाद आणि दृश्य आम्ही आमच्या सिनेमात दाखवले असते तर काय परिस्थिती उद्भवली असती, याची तुम्हीही कल्पना करू श्कता. आम्ही एखाद्या गँगस्टरची कथा आम्ही दाखवली असती तर कदाचित आमचा सिनेमा बॅन झाला असता. कदाचित आमचं मॉब लिचिंग झालं असतं, असं करण जोहर म्हणाला. 

साऊथ इंडस्ट्रीतील निर्माता दिग्दर्शकांना जे स्वातंत्र्य आहेत, ते बॉलिवूड मेकर्सला नाही. साऊथ इंडस्ट्रीतले मेकर्स हे स्वातंत्र्य एन्जॉय करतात. बॉलिवूडमध्ये आम्ही डबल पर्सनॅलिटी म्हणून जगत आहोत आणि हेच कुठेतरी थांबवण्याची गरज आहे. मी साऊथ इंडस्ट्रीवा आदर करतो. अशा प्रकारचे चित्रपट भारतात निर्माण होणं ही आनंदाची आणि अभिमानाचीच बाब असल्याचंही तो म्हणाला.

  गेल्या काही दिवसांत सातत्याने बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होत आहेत. अनेक मोठे चेहरे असणारे आणि मोठं बॅनर असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काहीच कमाल करू शकले नाहीत. शाहीद कपूरचा जर्सी, अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांचा रनवे 34, टायगर श्रॉफचा हिरोपंती 2, कंगना राणौतचा धाकड, रणवीर सिंगचा जयेशभाई हे चित्रपट जोरदार आपटले. नुकताच रिलीज झालेला अक्षय कुमारचा ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपटही फ्लॉप झाला आहे. याऊलट साऊथचे अनेक सिनेमे गर्दी खेचत आहेत. ‘केजीएफ 2’ हा सिनेमा गेल्या14 एप्रिल रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता.  जगभरात आतापर्यंत या चित्रपटानं 1200 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. पाठोपाठ ‘आरआरआर’नं तुफान गाजला. त्याआधी आलेला ‘पुष्पा’ या चित्रपटानेही अभूतपूर्व कमाई केली.  

टॅग्स :करण जोहरबॉलिवूडTollywoodकेजीएफआरआरआर सिनेमा