Join us

‘कभी खुशी कभी गम’ मला बसलेली जोरदार चपराक ...; असे का म्हणाला करण जोहर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 10:57 AM

करणच्या दिग्दर्शनात साकारलेला ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट आजही अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. पण...

ठळक मुद्दे‘कुछ कुछ होता है’ हा करणचा पहिला सिनेमा होता. ‘कभी खुशी कभी गम’ हा करणने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा होता.

निमार्ता- दिग्दर्शक करण जोहरचा वेगळा असा एक चाहता वर्ग आहे. कौटुंबिक मुल्य जपतानाच त्यातून  प्रेमकहाणी फुलवत कथानकाला वेगळ वळण देण्यात करण जोहरला तोड नाही. त्याचे असे अनेक चित्रपट गाजलेत. त्याच्या अशाच काही गाजलेल्या चित्रपटांपैकी एक नाव म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’. करणच्या दिग्दर्शनात साकारलेला हा चित्रपट आजही अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टमध्ये अग्रस्थानी आहे. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर आणि इतरही कलाकारांचा सहभाग असणा-या या चित्रपटाची जादू काही औरच. पण करणचे मत काही औरच आहे. होय, 2001 मध्ये रिलीज झालेला हा सिनेमा म्हणजे, मला लगावलेली जोरदार चपराक असल्याचे करणने म्हटले आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत करण या चित्रपटाबद्दल बोलला. हा सिनेमा माझी सर्वात मोठी चूक असल्याचे तो म्हणाला. ‘कभी खुशी कभी गम’ बनवत असताना मी हिंदी सिनेमाचा सर्वात मोठा सिनेमा बनवतोय, अशी माझी भावना होती. या सिनेमात बॉलिवूडच्या दिग्गजांना घेणे माझे लक्ष्य होते. मी एक यादगार सिनेमा बनवतोय, लोक या चित्रपटाला वर्षानुवर्षे स्मरणात ठेवतील, असे मला वाटले होते. पण चित्रपट रिलीज झाला आणि समीक्षक व पुरस्कारांच्या रूपात या चित्रपटाला मिळालेली खराब प्रतिक्रिया पाहून मला धक्काच बसला होता. हा सिनेमा मला बसलेली जोरदार चपराक होता, असे करण यावेळी म्हणाला.

‘कभी खुशी कभी गम’ भव्यदिव्य बनवण्यात करणने कुठलीही कसूर सोडली नव्हती. अमिताभ बच्चन, जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन, करिना कपूर, शाहरूख खान, काजोल असे दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले होते. राणी मुखर्जी ही सुद्धा एका छोट्याशा भूमिकेत होती.‘कुछ कुछ होता है’ हा करणचा पहिला सिनेमा होता. या चित्रपटासाठी करणला बेस्ट डायरेक्टर आणि बेस्ट स्क्रिनप्ले फिल्मफेअर अवार्ड मिळाला होता. ‘कभी खुशी कभी गम’ हा करणने दिग्दर्शित केलेला दुसरा सिनेमा होता. 2001 मध्ये तो प्रदर्शित झाला होता.

टॅग्स :करण जोहरशाहरुख खानकाजोल