Join us  

Karan Johar Vanity Van : करण जोहरची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आतून कशी दिसते? पाहा इनसाईड व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 11:56 AM

Karan Johar Vanity Van : 5 स्टार हॉटेलपेक्षाही आलिशान आहे करण जोहरची व्हॅनिटी व्हॅन...

Karan Johar Vanity Van : आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा करण जोहर (Karan Johar) त्याच्या लक्झरी लाईफसाठी ओळखला जातो. आपल्या कपड्यांमुळे, स्टाईलमुळे त्याची सतत चर्चा होताना दिसते. करण स्वत: याबद्दलचे अपडेट शेअर करत असतो. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या घरातील काही व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांना त्याच्या घराची झलक दाखवली होती. आता त्याने त्याच्या अलिशान  व्हॅनिटी व्हॅनची झलक चाहत्यांना दाखवली आहे.

होय, करणने पहिल्यांदा त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचा आतील ‘नजारा’ दाखवणारा व्हिडीओ शेअर केला आहे. करणने इंस्टाग्रामवर त्याच्या व्हॅनिटी व्हॅनचा एक छोटा व्लॉग शेअर केला आहे. यात तो स्वत:ही दिसत आहे.  व्हॅनिटी व्हॅनमध्ये करणला पाच गोष्टी लागतात म्हणजे लागतात... त्या पाच गोष्टी कोणत्या? याचा खुलासाही त्याने या व्हिडीओत केला आहे.

‘चष्मा ठेवण्यासाठी मला खूप जागा लागते. मला अंगठ्यांची आवड आहे. त्यामुळे अंगठ्या आणि माझ्या इतर अ‍ॅक्सेसरीजसाठीही मला वेगळी जागा हवी असते. मला व्हॅनिटीमध्ये आरामदायी उशा हव्या असतात. याशिवाय माझ्याकडे सतत गेस्ट येत असतात, त्यामुळे कॉफी मशीन आवश्यक आहे. शिवाय मला गरज जेवण लागतं, त्यामुळे माझ्या व्हॅनिटीमध्ये मला मायक्रोवेव ओवन हवंच, असं त्याने या व्हिडीओत सांगितलं आहे. माझी प्रोडक्शन डिझायनर अमृताने माझ्या स्वेटशर्टमधून या सगळ्या उशा डिझाइन केल्या आहेत. त्यासाठी तिने माझे बरेच स्वेटशर्ट फाडले आणि त्यातून या छान उशा बनवल्या आहेत, अशी माहितीही त्याने दिली आहे.

करणची लक्झरी व्हॅनिटी व्हॅन खूपच आकर्षक आहे. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये करणच्या आवडीच्या आणि आरामाच्या सर्व सोयी सुविधा आहेत. त्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये  एक मोठा आरामदायक सोफा  आहे. समोर एक शेल्फ आहे. त्याचे शूज आणि कपडे ठेवण्यासाठी एक स्वतंत्र कपाट आहे. शिवाय एक छोटसं किचनही आहे. एकंदर काय तर करणची व्हॅनिटी त्याच्या लक्झरी लाईफ स्टाईलनुसार एकदम लक्झरी आहे.

टॅग्स :करण जोहरबॉलिवूड