Join us

'तुला बायकांसारखं व्हायचंय का?'; करणची 'ही' आयडिया ऐकताच वडिलांनी होतं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 4:18 PM

Karan johar: अलिकडेच 'कॉफी विद करण' या शोचं प्रिमियर सोहळा पार पडला. या निमित्ताने करणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा एक अनुभव शेअर केला आहे.

बॉलिवूडचा प्रसिद्घ दिग्दर्शक, निर्माता करण जोहर (Karan Johar) अनेकदा त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. आतापर्यंत दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीमुळे चर्चेत येणारा करण सध्या त्याच्या कॉफी विद करण (Koffee With Karan) या टॉक शोमुळे चर्चेत आहे. लवकरच या शोचं ७ वं पर्व सुरु होणार असून सोशल मीडियावर करण आणि या शोच्या चर्चा रंगल्या आहेत. यामध्येच करणने एका मुलाखतीत या शोविषयी त्याच्या वडिलांचं मत काय होतं हे सांगितलं.

अलिकडेच 'कॉफी विद करण' या शोचं प्रिमियर सोहळा पार पडला. या निमित्ताने करणने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या वडिलांचा एक अनुभव शेअर केला आहे. ज्यावेळी हा शो सुरु झाला. त्याच वर्षी करणच्या वडिलांचं निधन झालं. परंतु, या शोविषयीची कल्पना वडिलांसमोर मांडल्यानंतर त्यांनी थक्क करणारं उत्तरं दिलं होतं.

"मला एक टॉक शो सुरु करायचाय असं मी ज्यावेळी माझ्या वडिलांना सांगितलं त्यावेळी त्यांनी मला विचित्र रिअॅक्शन दिली होती. ते म्हणाले होते. अच्छा, तर तू तुझ्या मित्रांना या कार्यक्रमात बोलावणार, त्यांच्याशी चर्चा करणार आणि ही चर्चा इतर प्रेक्षक पाहणार? असा प्रश्न विचारला. त्यावर मी हो म्हणालो. यावर मित्रांशी चर्चा करायला तुला कोण पैसे देणार आहे? तसंही तू पार्टीमध्य त्यांना रोज भेटतोसच ना, असं ते म्हणाले. मुळात माझी संकल्पनाच त्यांनी कळली नव्हती," असं करण म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "वडिलांनी नीट संकल्पना न कळल्यामुळे ते मला म्हणाले, म्हणजे थोडक्यात तू तबस्सुम किंवा सिम्मी ग्रेवाल या बायकांसारखा कार्यक्रम करु इच्छितोस का? तू असा काहीसा कार्यक्रम करणार आणि त्या बदल्यात एवढे पैसे मोजणार?".  त्या काळात तबस्सुम आणि सिम्मी ग्रेवाल यांचे टॉक शो प्रचंड फेमस होते. त्यांच्या कार्यक्रमात अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या पर्सनल आयुष्यातील गुपितं सांगितली होती. 

दरम्यान, ज्यावेळी 'कॉफी विद करण' प्रेक्षकांच्या भेटीला आला त्याच्या काही महिन्यांपूर्वीच करणच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळे हा शो करण्यासाठी करण भावनिकरित्या तयार नव्हता. म्हणून त्याने या शोचे फक्त २ सीझन करण्याचं कॉन्ट्रॅक्ट साइन केलं होतं. जून २००४ मध्ये करणच्या वडिलांचं निधन झालं आणि, नोव्हेंबर २००४ मध्ये या शोचा पहिला सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.

टॅग्स :करण जोहरबॉलिवूडसेलिब्रिटीटेलिव्हिजन