Join us

Karan Johar : ५ कोटीच्या ओपनिंगसाठी २० कोटी मागतात; करणची अभिनेत्यांवर टीका; म्हणाला, तेलगू फिल्म इंडस्ट्री...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2023 12:26 PM

बॉलिवुड इंडस्ट्रीचा सध्या फार वाईट काळ सुरु आहे. अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप झाले. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने थेट बॉलिवुड कलाकारांवर टीका केली आहे

Karan Johar : बॉलिवुड इंडस्ट्रीचा सध्या फार वाईट काळ सुरु आहे. हिंदी सिनेमांना प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. कोरोनापासून परिस्थिती कठीण झाली आहे. अनेक बिग बजेट सिनेमे फ्लॉप झाले. दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने थेट बॉलिवुड कलाकारांवर टीका केली आहे. ५ कोटींच्या सिनेमा ओपनिंगला अभिनेते २० कोटी फीस मागतात. या भ्रमावर कोणतीच व्हॅक्सीन नाही असे त्याने म्हणले आहे.

मास्टर्स यूनियन पॉडकास्टमध्ये करण जोहरने बॉलिवुडच्या सध्याच्या परिस्थितीनर खुलेआम भाष्य केले. गेल्या २५ वर्षांपासून करण या इंडस्ट्रीत आहे, त्याचे बॉलिवुडमध्ये मोठे नाव आहे. तसेच तो अनेक आघाडीच्या कलाकारांचा लाडका दिग्दर्शक आहे. असे असतानाही करणने केलेले वक्तव्य खळबळ  माजवणारे आहे. करण म्हणाला, 'मी बॉलिवुडबाबत खूप भावूक आहे.हिंदी सिनेमा माझ्या मनात आहे. पण जर व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर ही माझी आवडती इंडस्ट्री नाही. मग मला तेलगू इंडस्ट्री जास्त आवडते.' 

इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त पैसे कोण कमावतं ? यावर करण म्हणाला, 'ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे पण चित्रपटाचं ओपनिंग जर ५ कोटींचं असेल आणि तुम्ही मला २० कोटींची मागणी करत असाल तर हे योग्य आहे का, या भ्रमाची कोणतीच व्हॅक्सीन नाही. कोरोना आणि लॉकडाऊननंतर सिनेमाचा बिझिनेस कमी झाला. असं असतानाही बॉलिवुड कलाकारांनी मानधन कमी न करता ते आणखी वाढवले.'

'स्टुडेंट ऑफ द इयर' वेळी झाले नुकसान 

करण जोहरने सांगितले की, आलिया भट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांना लॉंच केलेला सिनेमा स्टुडंट ऑफ द इयर हिट झाला. तरी मला त्यातून नुकसानच झाले होते. यश चोप्रा यांनी एकदा सांगितले होते, 'सिनेमा कधी फेल होत नाही, बजेट फेल होते.'हेच स्टुडंट ऑफ द इयर सोबत घडले. एक सिनेमा देऊनही मला नुकसानाला सामोरे जावे लागले. मी अक्षरश: रोज रात्री गोळी घेऊन झोपायचो.

टॅग्स :सिनेमाकरण जोहरबॉलिवूड