अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार करणने MAMI म्हणजे मुंबई अॅकेडमी ऑफ द मुविंग इमेजच्या डायरेक्टर पदावरुन राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर, बातमी अशी ही आहे की, MAMI फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण यांनीही करणला समजवण्याचा प्रयत्न केला, पण करणने तिचे म्हणणे ऐकले नाही आणि राजीनामा दिला आहे.
MAMIच्या बोर्डावर विक्रमादित्य मोटवानी, सिद्धार्थ रॉय कपूर, दीपिका पादुकोण, जोया अख्तर आणि कबीर खान आहेत. रिपोर्टनुसार, करण जोहर यांना फिल्म इंडस्ट्रीच्या कलाकारांवर नाराज आहे कारण या कठीण काळात कोणीही त्याच्या बाजूने उभे राहिले नाही. त्याला सोशल मीडियावर सतत त्याला ट्रोल केले जात होते पण इंडस्ट्रीतील कोणीही व्यक्ती त्याला मदत करायला पुढे आली नाही, त्याला त्याला सपोर्ट केला.
सोशल मीडियावर त्याच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. करणसोबत आलिया भट, सलमान खान, सोनम कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांसुद्धा ट्रोल केले जातेय.