बॉलिवूड इंडस्ट्रीतील भल्या-बुºया गोष्टींवर बोलणा-यांपैकी एक म्हणजे करण जोहर. करणने अनेक नव्या चेह-यांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. आलिया भट्ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा, जान्हवी कपूर अशा अनेकांना करणने ओळख दिली, असे म्हटले तर वावगे होणार नाही. पण आता बॉलिवूडमध्ये नव्या पिढीच्या कलाकारांबद्दल करण जे काही बोलला ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. होय, अलीकडे एका मुलाखतीत करणने बॉलिवूडमध्ये नव्या कलाकारांबद्दल अगदी परखड मत मांडले. होय, एक दोन सिनेमे गाजले ना गाजले की, तरूण कलाकारांच्या डोक्यात हवा जाते. त्यांचा अहंकार वाढतो, असे करण यावेळी म्हणाला. केवळ इतकेच नाही, तर हा एकप्रकारचा आजार आहे आणि हा आजार इंडस्ट्रीत वेगाने फोफावतो आहे, असेही तो म्हणाला.
बॉक्स आॅफीसवर तुमचे एक-दोन चित्रपट गाजले की अनेक जण स्वत:ला सुपरस्टार मानू लागतात. काही कलाकारांच्या मेकअपचाच खर्च दिवसाला एक लाख रुपये इतका असतो. अशी लोकं खरंच वेडी असतात. दोन चार चित्रपट हिट झाले ना झालेत, त्यांचा तोरा वाढतो. ते भ्रमात वावरू लागतात, असे करण म्हणाला.