Join us

Karan Johar Birthday : करण जोहर लग्न करतोय? ‘त्या’ ट्विटनंतर सुरू झाली चर्चा,पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 16:29 IST

Karan Johar Birthday : वाढदिवसाचं निमित्त साधून करणने एक ट्विट केलं. काहीच क्षणात सोशल मीडियावर करण काय घोषणा करणार, यावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधणं सुरू केलं.

Karan Johar Birthday : बॉलिवूडचा दिग्गज निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आज त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करतोय. करणसाठी त्याचा 50 वा वाढदिवस एकदम खास आहे. त्याचा 50 व्या वाढदिवसाचं ग्रँड सेलिब्रेशन झालं. चाहत्यांनीही करणवर शुभेच्छांचा वर्षाव केला आणि बदल्यात करणने चाहत्यांना एक रिटर्न गिफ्टही दिलं.

खास दिवस.. खास नोट... खास घोषणा...वाढदिवसाचं निमित्त साधून करणने एक ट्विट केलं. खास दिवस... खास संदेश...खास घोषणा...लक्ष ठेवा..., अशा आशयाचं त्याचं ट्विट पाहून त्याचे चाहते आनंदाने बेभान झालेत. काहीच क्षणात सोशल मीडियावर करण काय घोषणा करणार, यावर चर्चा सुरू झाली. अनेकांनी वेगवेगळे अंदाज बांधणं सुरू केलं. काहींनी करण नव्या सिनेमाची घोषणा करणार, असा अंदाज बांधला तर काहींनी तो ‘लायगर’ या सिनेमाचा टीझर लॉन्च करणार, असा अंदाज बांधला. अन्य काहींनी करण आणखी काही स्टार किड्सला लॉन्च करणार, असल्याचं मानलं. तर काहींनी चक्क करण लग्नाची घोषणा करून चाहत्यांना सरप्राईज देणार असल्याचा अंदाज व्यक्त केला.

करणने काय केली घोषणा...अर्थात चाहत्यांचे सर्व अंदाज करणने फोल ठरवले. 50 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून करणने एक संदेश जारी केला. ‘मी 27 वर्षांपासून या इंडस्ट्रीत काम करतोय आणि या इंडस्ट्रीनं मला सर्वोत्तम असा अनुभव दिला आहे. या 27 वर्षांत मी अनेक कथा सांगितल्या, त्या साकारताना पाहिल्या, त्या पडद्यावर जिवंत करणारे जिवंत अभिनय करणारे कलाकार पाहिले... मी माझी स्वप्नं प्रत्यक्षात जगलो. मी सर्वांचा आभारी आहे. माझं कौतुक करणारे, माझ्यावर प्रेम करणारे आणि मला ट्रोल करणारे सर्वांचा माझ्या आयुष्यातील यशात वाटा आहे. मला घडवण्यात सर्वांचं योगदान आहे,’ असं त्याने लिहिलं. 50 व्या वाढदिवशी करणने दोन मोठ्या घोषणा केल्यात. ‘दीर्घकाळानंतर मी दिग्दर्शन क्षेत्रात परततोय. मी दिग्दर्शित केलेला रॉकी और रानी की प्रेमकहानी 10 फेबु्रवारी 2023 रोजी प्रदर्शित होतोय,’अशी पहिली घोषणा त्याने केली. याशिवाय त्याने एका अ‍ॅक्शन चित्रपट घेऊन येत असल्याची गुडन्यूजही दिली. करण जोहर पहिल्यांदा एका अ‍ॅक्शन चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. 2023च्या एप्रिल महिन्यात याचं शूटींग सुरू होणार आहे. याची घोषणाही त्याने केली. 

टॅग्स :करण जोहरबॉलिवूड