करण जोहरने ही घेतली प्रतिज्ञा, कॅटरिना कैफने त्यावर दिले हे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 12:12 PM2018-12-18T12:12:45+5:302018-12-18T12:15:41+5:30

बॉलिवूडमधील अनेक आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते. त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात येते. तसेच अश्लील हावभाव, शब्दांचा या गाण्यात प्रचंड भरणा असतो असे करण जोहरला वाटत आहे.

Karan Johar took the pledge, Katrina Kaif gave the answer to that | करण जोहरने ही घेतली प्रतिज्ञा, कॅटरिना कैफने त्यावर दिले हे उत्तर

करण जोहरने ही घेतली प्रतिज्ञा, कॅटरिना कैफने त्यावर दिले हे उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देअनेकवेळा तर चित्रपटाच्या कथेची मागणी नसताना देखील आयटम साँग चित्रपटात उगाचच टाकले जात असल्याचे आजकाल अनेक चित्रपटात पाहायला मिळत आहे आणि त्याच कारणामुळे यापुढे मी माझ्या चित्रपटात आयटम साँगचा समावेश करणार नाही असे निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ठरवले आहे.करणचा हा निर्णय चिकनी चमेलीवर थिरकलेल्या कॅटरिना कैफला आवडलेला नाहीये. कारण याविषयी मीडियाशी बोलताना कॅटरिनाने सांगितले की, आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते असे मला वाटत नाही.

अग्निपथ या चित्रपटातील चिकनी चमेली हे गाणे प्रचंड गाजले होते. या गाण्याचे गीत, संगीत, या चित्रपटाची कोरिओग्राफी, या गाण्यातील कॅटरिना कैफच्या अदा प्रेक्षकांना भावल्या होत्या. हे गाणे रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. चिकनी चमेलीसारखेच मेरा नाम मेरी है हे गाणे देखील धर्मा प्रोडक्शनच्या चित्रपटातील आहेत. पण आता अशी आयटम साँग्स बनवायची नाहीत असे धर्मा प्रोडक्शनच्या करण जोहरने ठरवले आहे. त्याबाबत त्याने नुकतेच मीडियाला देखील सांगितले आहे.

बॉलिवूडमधील अनेक आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते. त्यांना चुकीच्या पद्धतीने चित्रीत करण्यात येते. तसेच अश्लील हावभाव, शब्दांचा या गाण्यात प्रचंड भरणा असतो असे करण जोहरला वाटत आहे. अनेकवेळा तर चित्रपटाच्या कथेची मागणी नसताना देखील आयटम साँग चित्रपटात उगाचच टाकले जात असल्याचे आजकाल अनेक चित्रपटात पाहायला मिळत आहे आणि त्याच कारणामुळे यापुढे मी माझ्या चित्रपटात आयटम साँगचा समावेश करणार नाही असे निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने ठरवले आहे. आयटम साँग करण्याची चूक आता पुन्हा करणार नाही अशी शपथच करण जोहरने घेतली आहे. 

कोणत्याही आयमट साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते, अशा गाण्यांमधून वासना दिसते, त्यामुळे माझ्या चित्रपटातून किंवा कोणत्या गाण्यातून महिलांचा अपमान होईल अशी कोणतीच गोष्ट मी यापुढे करणार नाहीये असे करणने मीडियाशी बोलताना सांगितले आहे.

करणचा हा निर्णय चिकनी चमेलीवर थिरकलेल्या कॅटरिना कैफला आवडलेला नाहीये. कारण याविषयी मीडियाशी बोलताना कॅटरिनाने सांगितले की, आयटम साँगमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येते असे मला वाटत नाही. मी शीला की जवानी, चिकनी चमेली, सुरैया यांसारख्या गाण्यावर थिरकली आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाचा अनुभव खूपच चांगला होता. या गाण्यांमध्ये मला काहीही गैर वाटले नाही. 

करण जोहरने आयटम साँगविषयी घेतलेल्या निर्णयानंतर आता कोण कोणते निर्माते याबाबत निर्णय घेतात हे पाहाणे रंजक असणार आहेत. 

 

 

Web Title: Karan Johar took the pledge, Katrina Kaif gave the answer to that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.