करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या बॅनरखाली बनलेला ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला. पण या आठवडाभरात या चित्रपटाने कसाबसा 57.90 कोटींचा बिझनेस केला. पण हे काय? करण जोहर सोशल मीडियावर एक मोठी घोषणा करून मोकळा झाला. ही घोषणा होती, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ हिट झाल्याची. होय, कमाईचे आकडे शेअर करत, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा त्याने केला. त्याच्या या दाव्याचे हसू झाले नसेल तर नवल. लोकांनी त्या दाव्यानंतर करणची चांगलीच फिरकी घेतली.‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा करणने केला असला तरी प्रेक्षकांच्या मते, हा चित्रपट हिट नाही तर फ्लॉप आहे. या चित्रपटाचा बजेट होता ८० कोटींचा. असे असताना गत आठवडाभरात या चित्रपटाला ६० कोटींचाही पल्ला गाठता आला नाही. पण याचे भान न ठेवता हा चित्रपट हिट असल्याचे ट्वीट केले. लोकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत करणची मजा घेतली.
आम्हाला मूर्ख बनवू नकोस; करण जोहरला नेटकऱ्यांनी सुनावले!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 3:45 PM
होय, कमाईचे आकडे शेअर करत, ‘स्टुडंट ऑफ द इअर 2’ समरटाईम हिट असल्याचा दावा त्याने केला. त्याच्या या दाव्याचे हसू झाले नसेल तर नवल. लोकांनी त्या दाव्यानंतर करणची चांगलीच फिरकी घेतली.
ठळक मुद्देधर्मा प्रॉडक्शनचा हा सलग दुसरा सिनेमा फ्लॉप ठरला आहे. याआधी वरूण धवन, आलिया भट स्टारर ‘कलंक’ हा सिनेमा असाच आपटला.