Join us

आमीर खानला घाबरला होता करण जोहर, थेट लंडनलाच पळाला; काय होतं कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 1:39 PM

'कुछ कुछ होता है' मुळे करणचे नशीबच पालटले. पण...

बॉलिवूडमध्येकरण जोहरचं (Karan Johar) मोठं नाव आहे. सिनेसृष्टीत त्याची चलती आहे. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने 'कुछ कुछ होता है' सिनेमा बनवला जो सुपरहिट ठरला. यानंतर तो निर्माता दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होत गेला. 'कुछ कुछ होता है' मुळे करणचे नशीबच पालटले. या सिनेमाच्या यशाने तो प्रेरित झाला आणि त्याने 'कभी खुशी कभी गम' काढला. या सिनेमानेही चांगले यश मिळवले. हा करणचा दुसरा हिट सिनेमा होता. मात्र खूप कमी जणांना माहित असेल 'के3जी' सिनेमामुळे करण खूपच चिंतीत होता. काय कारण होतं बघुया.

'एक अनोखा लडका' या आत्मचरित्रात करणने लिहिले आहे की 'कुछ कुछ होता है' त्याच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. या फिल्ममुळे आयुष्यच पालटले. त्याच्याजवळ पैसे, गाडी, घर, महागाचे कपडे असं सगळंच आलं होतं. फिल्म सुपरहिट झाली म्हणून त्याला 'कभी खुशी कभी गम' सिनेमा बनवण्याची हिंमत झाली. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, काजोल, हृतिक, करिना कपूरला घेऊन त्याने K3G बनवला. त्याला वाटलं हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल. मात्र त्याआधीच आमीर खानचा 'लगान' सिनेमा रिलीज झाला. याशिवाय सनी देओलचा 'गदर'ही तेव्हाच रिलीज झाला होता. 'लगान' आणि 'गदर' या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी डोक्यावर उचलले. करण हे बघून चकितच झाला की अशा फिल्म कशा हिट होऊ शकतात.

करण म्हणाला,' ज्या लोकांनी फिल्म बघून स्तुती केली होती ते क्रिटिक्स k3G ला निगेटिव्ह रिव्ह्यू देत होते. मी खूप घाबरलो होतो. मला वाटलं हा सिनेमा बनवून मी सर्वात मोठी चूक केली आहे.'

एकीकडे 'लगान'ची चर्चा जोरात सुरु होती. तर दुसरीकडे करणला K3G फ्लॉप होईल अशी भीती वाटत होती. लगान आणि गदर च्या वादळात K3G ने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. पण जेव्हा अवॉर्डची वेळी आली तेव्हा 'लगान' ऑस्करसाठी नॉमिनेट झाला. तर करणला अवॉर्ड शो पासून दूर ठेवले गेले. म्हणूनच करण लंडनला निघून गेला.

'कभी खुशी कभी गम' जरी ऑस्करपर्यंत पोहोचला नसला तरी सिनेमाने बॉक्सऑफिसवर चांगली कामगिरी केली. यानंतरही करणने अनेक हिट सिनेमे दिले. आज तो प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकांच्या गणतीत येतो.

टॅग्स :करण जोहरआमिर खानबॉलिवूडसिनेमा