Join us

सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर करण जोहरचा 'कॉफी विद करण 7' शो आला मोठ्या अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 11:30 AM

सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहेत.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबीयांसोबतच चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. 14 जूनला सुशांतने वांद्रे येथील त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमच्या मुद्द्यावरून सोशल मीडियावर बरेच वाद सुरू आहे. ज्यात सुशांतच्या आत्महत्येला करण जोहरला जबाबदार ठरवले जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याच्यावर  टीका होत आहे एवढेच नाही तर त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. सुशांत सिंगच्या निधनानंतर संतप्त झालेल्या लोकांचा रोष अजूनही शांत झाला नाही ते सतत ट्विटरवर इंडस्ट्रीतला खडे बोल सुनावतायेत. 

लोकांकडून मिळत असलेल्या प्रतिक्रियांनंतर चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीचे निर्माते सावध झाले आहेत आणि ते त्यांचे प्लॅनिंग बदलण्याचा विचार करत आहेत. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरचा शो 'कॉफी विद करण'चा सातवा सीजन धोक्यत आहे. 

रिपोर्टनुसार, सोशल मीडियावर लोक ज्या पद्धतीने विरोध दर्शवित आहेत ते पाहून 'कॉफी विद करण'च्या निर्मात्यांनी सातवा सीजन शूट न करण्याचा निर्णय घेतला आहे.निर्मात्यांना वाटते की त्यांनी हा शो सुरू केल्यास ते ट्रोलिंगचा बळी पडू शकतात. याच बरोबर अनेक ए लिस्ट कलाकार शोमध्ये येण्यासाठी घाबरतायेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी मेकर्सला सांगितले आहे की ते या शोमध्ये सहभागी होणार नाहीत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतकरण जोहर