देवाच्या मनात असेल, ते होईल...; असे का म्हणाली बिपाशा बासू?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2020 10:17 AM2020-08-16T10:17:01+5:302020-08-16T10:21:27+5:30

जवळजवळ 5 वर्षांनी बिपाशा ‘डेंजरस’ या वेबसीरिजमधून कमबॅक करतेय. ते सुद्धा पती करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत.

is karan singh grover and bipasha basu considering adoption | देवाच्या मनात असेल, ते होईल...; असे का म्हणाली बिपाशा बासू?

देवाच्या मनात असेल, ते होईल...; असे का म्हणाली बिपाशा बासू?

googlenewsNext
ठळक मुद्देबिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते.

लग्नानंतर बिपाशा बासू संसारात रमली. पण आता जवळजवळ 5 वर्षांनी बिपाशा ‘डेंजरस’ या वेबसीरिजमधून कमबॅक करतेय. ते सुद्धा पती करण सिंग ग्रोव्हर याच्यासोबत. यामुळे बिपाशा व करण दोघेही जाम चर्चेत आहेत. या कमबॅकसोबतच बिपाशा व करणने फॅमिली प्लानिंगचेही संकेत दिले आहेत.
नवभारतटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत बिपाशा यावर बोलली. फॅमिली प्लानिंगबद्दल काय, असे विचारले असता, देवाला जे मंजूर असेल ते होईल, असे उत्तर बिपाशाने दिले. मूल झाले नाहीच तरीही काही अडचण नाही. आपल्या देशात खूप सारी निराधार मुलं आहेत. त्यांची देखभालही आम्ही करू शकतो. देशात अनेक मुलं अनाथ आहेत, अनेकांकडे सोयीसुविधा नाहीत. अशा मुलांना आमच्यापरीने सोयी-सुविधा पुरविणे हे सुद्धा आमची जबाबदारी आहे.  पुढे काय होते ते बघू, असे बिपाशा म्हणाली.

करणही यावर बोलला. बिपाशाच्या बोलण्याला दुजोरा देत तो म्हणाला, बिपाशा म्हणतेय ते अगदी योग्य आहे. फॅमिली प्लॅनिंगचे काम आम्ही देवाच्या भरवशावर सोडले आहे. आपण एक गोष्ट विसरतो ती म्हणजे, या जगात जेव्हा केव्हा एक नवीन जीव जगात येतो, तो स्वत:च्या नशिबाने आणि स्वत:च्या प्लॅनिंगने येतो. आपल्या हातात काहीही नसते.
करण व बिपाशाच्या या बोलण्यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे दोघेही फॅमिली प्लानिंगबद्दल कुठल्याही घाईत नाही. मूल झाले नाहीच तर ते दत्तक घ्यायचीही त्यांची तयारी आहे.

बिपाशा व करणबद्दल सांगायचे तर दोघांनी 30 एप्रिल 2016 रोजी लग्न केले होते.  सध्या बिप्स व करण दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत. दोघेही रोमॅन्टिक लाईफ जगत आहेत.

Web Title: is karan singh grover and bipasha basu considering adoption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.