हॉट आणि सेक्सी कपल अशी ओळख असणाऱ्या करणसिंह ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा असते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय असते. काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. हे सगळं होत असताना अनेकांना करणसिंहने त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी काडीमोड का घेतला आणि बिपाशाशी लग्न का केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याने असं का केलं असा प्रश्न आजही अनेकांना पडतो. यावरून अनेक चर्चाही ऐकायला मिळतात. मात्र यावर इतके दिवस मौन बाळगणाऱ्या करणने पहिल्यांदाच आपलं मौन सोडले आहे.
‘बेहद’फेम अभिनेत्री जेनिफर विंगेटने यावर काही बोलण्याआधी करणने भूमिका मांडली आहे. जेनिफरशी लग्न करणं ही आपली घोडचूक होती असं करणने एका मुलाखतीत म्हटलं आहे. काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात. त्यांचा जीवनसाथी म्हणून विचार होऊ नये असं सांगत जेनिफरशी केलेल्या लग्नाबाबत त्यानं पश्चाताप व्यक्त केला आहे. घाईघाईत निर्णय घेऊन आपण चूक केली होती, मात्र भविष्यात त्याची पुनरावृत्ती करणार नाही असंही तो या मुलाखतीत म्हणतो आहे.
नेटवर्थियर या वेबसाईटच्या माहितीनुसार, बिपाशाकडे 100 कोटींची मालमत्ता आहे तर करणकडे केवळ 13.4 कोटी इतकीच मालमत्ता आहे. बिपाशा आज चित्रपटांमध्ये खूप कमी काम करत असली तरी तरी ती अनेक चांगल्या ब्रँडसाठी जाहिरात करत असून याद्वारे ती चांगलाच पैसा कमावते. तसेच ती एक स्टेज शो करण्यासाठी दोन कोटी रुपये घेते. बिपाशाकडे अनेक महागड्या गाड्या असून मुंबईतील अतिशय पॉश एरियात तिची दोन घरं आहेत. याशिवाय कोलकतामध्ये देखील तिचे एक घर आहे. करण छोट्या पडद्यावर अनेक वर्षांपासून काम करत आहे. नेटवर्थियर या वेबसाईटनुसार तो मालिकेत काम करण्यासाठी एका दिवसाचे 80 हजार रुपये घेतो. त्याच्याकडे 13.4 कोटी इतकी संपत्ती आहे.