Join us

मलायका - करिनाने नाताशा पुनावाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, पोस्टने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 17:15 IST

 नताशा ही करिना कपूरची अगदी जवळची मैत्रिण आहे. तिच्यासोबत अनेक पार्ट्यांमध्ये नताशा दिसते. पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आता नताशा करिनासोबतच तिचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत मैत्री वाढवताना दिसतेय.

नताशा पूनावाला आज तिचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने तिच्या खास मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यांत सगळ्यात स्पेशल शुभेच्छा ठरल्या त्या  नताशाची जवळची मैत्रिणी असलेल्या करीना कपूर आणि मलायका अरोरा या दोघींनीही खास अंदाजात नताशाला शुभेच्छा दिल्या आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने सेलिब्रेटींसह नताशा पुनावालाच्या फोटोंना सोशल मीडियावर बरेच लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. 

मलायका अरोराने वाढदिवसाच्या दिवशी नताशाच्या शुभेच्छासाठी दोन फोटो  शेअर केली आहेत. पहिला एक मॉनोक्रोम फोटो आहे  मलायका आणि नताशा  हसताना दिसत आहेत. दुसरे एक थ्रोबॅक फोटो आहे  जे ते एकत्र आलेल्या पार्टीचे असल्याचे दिसतंय. याच फोटो करीना कपूर देखील आहे. “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा म्हणत पोस्ट शेअर केली आहे. 

करीना कपूरने इंस्टाग्रामवर नताशा पूनावालासह  असलेले  जुने फोटो समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. करिना मलायका व्यतिरिक्त नेहा धुपिया, मनीष मल्होत्रा, अनीता श्रॉफ, करिश्मा कपूर आणि रिया कपूर यांनी नताशा पूनावालाला इंस्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत.

नताशा ही करिना कपूरची अगदी जवळची मैत्रिण आहे. तिच्यासोबत अनेक पार्ट्यांमध्ये नताशा दिसते. पण स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, आता नताशा करिनासोबतच तिचा चुलत भाऊ रणबीर कपूरसोबत मैत्री वाढवताना दिसतेय. नताशा ही बिलिनिअर आदर पूनावालाची पत्नी आहे.

कोण आहे नताशा पुनावाला ?

जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’च्या सीईओ आदर पूनावाला यांची पत्नी नताशा पूनावाला हटके फॅशनसाठी ओळखल्या जातात. भारतासह जगभरातील टॉप डिझाइनरच्या कपड्यांचे कलेक्शन त्यांच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळते. 

टॅग्स :करिना कपूरमलायका अरोरा