बॉलिवूडमधील नवाब घराण्यातील सैफ अली खान आणि करीना कपूर खान ही जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. तैमूर व जेह या त्यांच्या दोन मुलांची सोशल मीडियावर बरीच चर्चा होताना दिसते. अनेकदा त्यांचे व्हिडीओही व्हायरल होत असतात. दोघेही लोकप्रिय स्टारकिड आहे. पापाराझीसमोर तैमूर तर कित्येकदा फोटोसाठी पोझही देताना दिसतो. त्या फोटोंमध्ये बऱ्याच वेळेस त्याला सांभाळणाऱ्या, त्याच्या नॅनी दिसतात. त्यांना महिन्याला लाखात पगार मिळतो असं बोललं जातं. आता पगाराबद्दल खुद्द त्यांनीच खुलासा केला आहे.
तैमूरला सांभाळणाऱ्या त्याच्या नॅनीबद्दल आता माहिती समोर आली आहे. नुकताच Hindi Rush ला दिलेल्या मुलाखतीत तैमुरच्या नॅनी ललिता डिसिल्वा यांनी तैमूर आणि जेह यांना सांभाळण्यासाठी मिळणाऱ्या पगाराबद्दल मोठं वक्तव्य केलं. 2.5 लाख रुपये पगार मिळतो का? या प्रश्नावर उत्तर देताना ललिता म्हणाल्या, "2.5 लाख रुपये? असं असतं तर बरं झालं असतं? तुमच्या तोंडात साखर पडो. पण, असं काही नाही. या सर्व फक्त अफवा आहेत".
घरात कशी वागणूक मिळते या प्रश्नावर त्या म्हणाल्या, "करीना कपूर आणि सैफ हे दोघेही खूप साधे आहेत. सकाळी नाश्यात स्टाफ, करीना आणि सैफ यांचे पदार्थ सारखेच असतात. स्टाफसाठी वेगळं असं काही नसतं. कधीकधी तर आम्ही एकत्र बसून नाश्ता करतो. आम्ही एकत्र क्वालीटी टाईम स्पेंड करतो". एवढंच नाही तर तैमूर, जेह त्यांच्यासोबत ललीतादेखील जेवतात, असं त्यांनी सांगितलं. दैनिक जागरणने याबाबत वृत दिलं आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर २०१२ साली विवाहबंधनात अडकले. करीनाने २०१६ मध्ये तैमूर तर २०२२च्या फेब्रुवारी महिन्यात जेहला जन्म दिला. करीना आणि सैफ अली खानप्रमाणेच त्यांच्या मुलांचाही चाहता वर्ग मोठा आहे. कपूर फॅमिलीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सांगायचं झालं तर, ललिता डिसिल्वा गेल्या अनेक वर्षांपासून तैमूर आणि जेह यांचा सांभाळ करत आहेत. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.