करिना झाली युवराज सिंगवर फिदा, पाहा बेबो-युवीचा धम्माल व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 10:55 AM2021-12-01T10:55:23+5:302021-12-01T10:56:31+5:30

काही दिवसांपूर्वीच बेबोनं क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतचा (YuvrajSingh) एक सेल्फी पोस्ट केला होता. आता युवराजसोबतचा तिचा  एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

kareena kapoor and yuvraj singh new punjabi video will make you laugh | करिना झाली युवराज सिंगवर फिदा, पाहा बेबो-युवीचा धम्माल व्हिडीओ 

करिना झाली युवराज सिंगवर फिदा, पाहा बेबो-युवीचा धम्माल व्हिडीओ 

googlenewsNext

चाहत्यांची लाडकी बेबो अर्थात करिना कपूर (Kareena Kapoor ) तिच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असते. सोशल मीडियावरही बेबो प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. काही दिवसांपूर्वीच बेबोनं क्रिकेटपटू युवराज सिंगसोबतचा (YuvrajSingh) एक सेल्फी पोस्ट केला होता. आता युवराजसोबतचा तिचा  एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत करिना व युवराज दोघंही धम्माल मस्ती करताना दिसत आहेत.
‘प्लीज, क्या एक बार आप फिर से बोलेंगे. आपका पंजाबी बोलने का ढंग बहुत सेक्सी है,’ असं व्हिडीओच्या सुरूवातीलाच करिना युवीला म्हणते. यानंतर युवी काही पंजाबी शब्द व वाक्य बोलतो आणि तेच शब्द बेबो इंग्रजीत तिच्या स्टाईलमध्ये बोलून दाखवते. बेबो दा डोला..., असं युवी म्हणतो आणि करिना कपूर तिची बॉडी दाखवण्याची अ‍ॅक्शन करते.  व्हिडीओत दोघंही एका ब्रँडचं प्रमोशन करताना दिसतात.

करिना व युवीने या व्हिडीओला कॅप्शनही दिलं आहे. बेबो दा डोला पावै रौला, असं युवीनं लिहिलं आहे तर त्यावर ‘त्वाडी कूल कॅट स्क्वॉड्स’ असा रिप्लाय करिनानं दिला आहे. दोघांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.
चाहत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
करिना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर लवकरच ती आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. आमिर व करिनाचा हा सिनेमा पुढीलवर्षी 14 एप्रिलला रिलीज होतोय. ‘3 इडियट्स’नंतर करिना व आमिर पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्याने साहजिकच फॅन्स क्रेझी झाले आहेत.

Web Title: kareena kapoor and yuvraj singh new punjabi video will make you laugh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.