Kareena Kapoor Third Pregancy: बॉलिवूडची ‘बेगम’ करीना कपूर खान (Kareena Kapoor) सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. बेबोचा पती सैफ अली खान शिवाय दोन्ही मुलं तैमूर व जेह हे सुद्धा तिच्यासोबत आहेत. या स्टार कपलच्या लंडन व्हॅकेशनचे एक ना अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत झाले होते आणि अशात एक फोटो पाहून चाहत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. होय, या फोटोत बेबोचं बेबी बम्प स्पष्ट दिसत होतं आणि यामुळे बेबो तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याची चर्चा सुरू झाली होती. खरं काय कळायला मार्ग नव्हता. पण आता करिनाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
इन्स्टास्टोरीवर करिनाने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने ती प्रेग्नंट नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘ शांत राहा, मी गरोदर नाहीये. हा सर्व पास्ता आणि वाईनचा परिणाम आहे. सैफच्या मते, त्याने आधीच लोकसंख्या वाढीत खूप मोठं योगदान दिलं आहे,’ असं करिनाने या इन्स्टा स्टोरीत म्हटलं आहे. या पोस्टमध्ये तिने स्माईल इमोजीही पोस्ट केले आहेत.
करिनाच्या या पोस्टने तिच्या प्रेग्नंसीच्या बातम्या अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे. करिना कपूर व सैफ अली खान दोन मुलांचे आईबाबा आहेत. तैमूर व जेह अशी त्यांच्या मुलांची नावं आहे. सैफला पहिली पत्नी अमृता सिंग हिच्यापासून सारा अली खान व इब्राहिम खान अशी आणखी दोन मुलं आहेत. म्हणजेच सैफ एकूण चार मुलांचा पिता आहे.
करिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं असेल तर ती लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.