बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा आतेभाऊ आदर जैन याने गुपचूप साखरपुडा केला आहे. आदर जैनने गर्लफ्रेंड अलेखा अडवाणीबरोबर साखरपुडा केला असून लवकरच ते दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. आदरने अगदी फिल्मीस्टाइल बीचवर गर्लफ्रेंडला प्रपोज करत लग्नासाठी मागणी घातली आहे. त्याच्या फिल्मी प्रपोजलचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
साखरपुड्याचे फोटो शेअर करत आदर जैनने ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे. या फोटोमध्ये आदर गुडघ्यावर बसून अलेखाला प्रपोज करत असल्याचं दिसत आहे. समुद्रकिनारी हार्टमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचं डेकोरेशन आणि "marry me" असं दिसत आहे. "माझी पहिली क्रश, बेस्ट फ्रेंड, माझं वर्तमान आणि भविष्य" असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोवर करीना कपूरने त्यांना शुभेच्छा देत मजेशीर कमेंट केली आहे. "मेहेंदी लगाकर रखना, डोली सजाकर रखना" अशी कमेंट करीनाने केली आहे.
आदर जैन बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारीयासोबत रिलेशनशिपमध्ये होता. जवळपास ३ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. पण, त्यानंतर काही कारणांनी त्यांचं ब्रेकअप झाल. आता आदरने त्याची बालपणीची मैत्रीण आणि बेस्ट फ्रेंडलाच आपलं लाइफ पार्टनर बनवलं आहे. अलेखा अडवाणी ही आदरची एक्स गर्लफ्रेंड तारा सुतारीयाचाही मैत्रीण आहे.
कोण आहे अलेखा अडवाणी?
आदर जैनने काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण, अलेखा सिनेइंडस्ट्रीपासून दूर असते. तिने न्यूयॉर्कमधून तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ज्वेलरी आणि कपड्याच्या ब्रँडसाठी ती मॉडेलिंग म्हणून काम करते. तारा सुतारीया आणि आदर जैन रिलेशनशिपमध्ये असताना ती अनेकदा त्यांच्याबरोबर फिरायलाही जायची. त्यांचे फोटोजही व्हायरल झाले होते.