आपल्या पहिल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच शिवलिका ऑबेरॉयला विद्युत जामवालसोबत दुसरा सिनेमा मिळाला. ती तिच्या भूमिकेसाठी जी-तोड मेहनत घेत असते. तिने सांगितले की एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे भूमिकेचा अभ्यास करते, नोट्स बनवते आणि आजबाजूच्या कलाकारांकडून शिकण्याचा प्रयत्न करते.
शिवालिका ऑबेरॉय म्हणाली की, जेव्हा मी सेटवर असते तेव्हा मी दिग्दर्शकासाठी विद्यार्थ्याप्रमाणे असते. मी आधी स्क्रिप्ट वाचते आणि बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न करते. मी नेहमीच नोट्स बनवते. मला वाटते त्यामुळे भूमिका साकारण्यासाठी चांगली मदत मिळेल. मी माझे लाईन्स खूप चांगल्या प्रकारे आठवते. मी सीन्सची तयारी करताना डायलॉग रेकॉर्ड करते आणि पाहते की माझे कॅमेऱ्यावर एक्सप्रेशन कसे दिसतात.