Join us

'चमेली'मध्ये सेक्स सीन होते मिसिंग...असं म्हणणाऱ्यांना करीना कपूरनं दिलं सडेतोड उत्तर, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 12:17 IST

Kareena Kapoor : २००३ मध्ये रिलीज झालेला 'चमेली' हा करीना कपूरच्या लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. पडद्यावर कोणतेही इंटिमेट सीन न देता बेबोने आपली व्यक्तिरेखा अतिशय सुंदरपणे साकारलीय.

करीना कपूर (Kareena Kapoor) बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने तिच्या करिअरमध्ये सर्व दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे आणि करिअरमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट केले आहेत. करिअरच्या यशाच्या शिखरावर असताना करीना कपूरने 'चमेली' (Chameli Film) सिनेमात काम केले. ज्यात ती सेक्स वर्करच्या भूमिकेत दिसली होती. तिने अशा प्रकारची भूमिका करून सर्वांना हैराण केले होते. चमेली प्रदर्शित झाल्यानंतर करीना कपूरने तिच्या भूमिकेची तुलना प्यासा सिनेमातील वहिदा रहमान यांच्यासोबत केली होती. बेबो म्हणाली होती की, काही चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, चित्रपटात सेक्स अपील कमी होते.

सैयद फिरदौस अशरफसोबत केलेल्या बातचीतमध्ये करीना कपूर म्हणाली होती की, जेव्हा इंडस्ट्रीत लोक चमेली चित्रपट पाहत होते, तेव्हा ते म्हणत होते की, अरे चमेलीमध्ये थोडे सेक्स मिसिंग होते. त्यांना हे कळत नाही की प्यासा चित्रपटात वहिदा रहमान यांनीदेखील सेक्स सीन्स केले नव्हते. मला खंत वाटते की, तुम्ही राज कपूर यांच्या नातीकडून अशा सीन्सची आशा कशी काय करू शकता.

मल्लिका शेरावतवर भडकली होती बेबोयाच मुलाखतीत करीना कपूर मल्लिका शेरावतवर नाराजी व्यक्त केली. मल्लिका शेरावत म्हणाली होती की, राज कपूर यांच्या नायिकांनी स्वतःला एक्सपोझ केले होते. यावर करीना म्हणाली की, तिला कळत नाही का, ती काय बोलत आहे. तिने स्वतःचीच चेष्टा करून घेतली आहे. ती एका लिजेंडबद्दल बोलत आहे. राज कपूर यांनी महिलांना नेहमीच आदर आणि सन्मानाने सादर केले आहे.

२००३ साली रिलीज झाला होता 'चमेली'करीना कपूरचा चित्रपट चमेली २००३ साली प्रदर्शित झाला होता. यात बेबोनं सेक्स वर्कर चमेलीची भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले होते. यात करीनाचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला होता. चित्रपट समीक्षकांनी या सिनेमातील करीनाच्या कामाचं खूप कौतुक केले होते.

टॅग्स :करिना कपूरमल्लिका शेरावत