Join us

करीना कपूर खानने आपल्या कमबॅकचे श्रेय दिले 'या' व्यक्तिला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2018 5:26 AM

अभिनेत्री करीना कपूर खान हिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट करीनासाठी खूपच खास ...

अभिनेत्री करीना कपूर खान हिचा आगामी चित्रपट वीरे दी वेडिंगचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट करीनासाठी खूपच खास आहे कारण तैमूरच्या जन्मनंतरचा करीनाचा हा पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे आपल्या कमबॅकला घेऊन करिना खूपच उत्साहित आहे. नुकतेच करीनाने वीरे दी वेडिंगच्या प्रमोशन दरम्यान आपल्या कमबॅकचे पूर्ण श्रेय पती सैफ अली खानला दिले. करीना म्हणाली, सैफनेच तिला कमबॅक करण्यासाठी प्रोत्साहित केले. मला या गोष्टीचा आनंद आहे की मला सैफसारखा लाईफ पार्टनर मिळाला आहे. तो नेहमीच माझ्यामागे खंबीरपणे उभा असतो आणि मी घरी नसताना तैमूरची सगळी जबाबदारी घेतो.  ती पुढे म्हणाली, तैमूरच्या जन्मानंतर सैफ मला जीम आणि फिटनेसकडे लक्ष द्यायला सांगतो.  ALSO READ :  LMOTY 2018 : ‘पॉवर आयकॉन’ पुरस्काराने करिना कपूरचा गौरव!वीरे दी वेडिंग चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक घोष करतो आहे. यात करीनासह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.  हा चित्रपट म्हणजे चार मुलींची कथा आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करीना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. या चित्रपटातून रिया ही बॉलिवूडमध्ये प्रवेश करते आहे. 1 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.